Lokhandwala to Vikhroli Metro: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांच्या ब्लॉकदरम्यान मेट्रो लाइन 6साठी 3 गर्डर उभारण्यात आले. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी ही एक महत्त्वाची मार्गिका आहे.
कसे उभारले गर्डर?
जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकदरम्यान हे काम पार पडले. 2 आणि 3 मे 2026च्या मध्यरात्री, राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकादरम्यान प्रत्येकी 32 मीटर लांबीचे आणि सुमारे 110 मेट्रिक टन वजनाचे असे तीन गर्डर यशस्वीरीत्या बसविण्यात आले. या कामासाठी सहाव्या लाईन आणि शंटिंग लाईनवर 10 तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच, अप फास्ट लाईन आणि पाचव्या लाईनवर अनुक्रमे 3 तास आणि 5 तासांचा ब्लॉक घेण्यात आला. विशेष म्हणजे, नियोजित वेळेपेक्षा तब्बल 30 मिनिटे आधी हे काम पूर्ण करण्यात आले.
Vadhavan Port: वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?
या संपूर्ण कामासाठी रेल्वे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एकूण 110 जणांची टीम कार्यरत होती. काम सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यात 600 टन क्षमतेचा एक क्रेन, 500 टन क्षमतेचे दोन क्रेन, तसेच प्रत्येकी 500 टन क्षमतेचे दोन स्टँडबाय क्रेन, दोन हायड्रा, दोन जेसीबी, एक मटेरियल लिफ्टर आणि दोन टॉवर वॅगन यांचा समावेश होता. या यशस्वी कामगिरीमुळे मेट्रो लाईन 6 च्या प्रगतीला वेग मिळणार असून, मुंबईतील वाहतूक व्यवस्थेतही भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पिंक लाइन म्हणून ओळखली जाणारी मुंबई मेट्रो लाइन 6 मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. हा मार्ग लोखंडवाला (स्वामी समर्थ नगर) ते विक्रोळी (पूर्व द्रुतगती महामार्ग) दरम्यान उभारण्यात येत आहे. सुमारे 14.5 किलोमीटर लांब उन्नत मार्गिकेवर 13 स्थानकं आहेत. हा मार्ग मुंबईतली इतर मेट्रो लाइन आणि रेल्वे मार्गांना जोडणारा एक मुख्य मार्ग आहे. लोखंडवाला ते विक्रोळी प्रवासाला सध्या 1 तास ते 90 मिनिटे घेतो, तो मेट्रोमुळे अवघ्या 30-35 मिनिटांत पूर्ण होईल.
Santacruz-Chembur Link Roadचा अंतिम टप्पा पूर्ण होणार! पश्चिम-पूर्व द्रुतगती महामार्ग सिग्नल-मुक्त प्रवास कधीपासून शक्य?
मेट्रो मार्ग 6 स्थानकांची यादी:
1. स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला): हे या मार्गाचे सुरुवातीचे स्थानक आहे. (मेट्रो 2अ शी जोडणी)
2. आदर्श नगर
३. जोगेश्वरी (पश्चिम): हे स्थानक पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे.
4. जेव्हीएलआर (JVLR) जंक्शन: (मेट्रो 7शी जोडणी)
5. श्याम नगर
6. महाकाली लेणी (Mahakali Caves)
7. सीप्झ व्हिलेज (SEEPZ Village): (मेट्रो 3 – ‘अॅक्वा लाईन’शी जोडणी)
8. साकी विहार रोड
9. रामबाग (पवई)
10. पवई तलाव (Powai Lake)
11. आयआयटी पवई (IIT Powai)
12. कांजूरमार्ग (पश्चिम): हे स्थानक मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ आहे. (मेट्रो 4 – ‘ग्रीन लाईन’शी जोडणी)
13. विक्रोळी (पूर्व द्रुतगती महामार्ग): हे या मार्गाचे शेवटचे स्थानक आहे.
