• Sun. Jun 14th, 2026
    Vivek Kolhe : दंड थोपटले, मिश्या पिळल्या, ‘पुष्पा’ स्टाईल करत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हेंचा हटके अंदाज

    कोपरगावचे सुपुत्र विवेक कोल्हे यांना भाजपकडून विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळाली आहे. आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोपरगावात दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, कोपरगाव/अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे. विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर कोपरगावचे सुपुत्र विवेक कोल्हे यांचे शहरात प्रथमच आगमन झाले. यावेळी कोपरगावच्या भूमीत त्यांचे जे ऐतिहासिक स्वागत झाले, त्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे. ओपन जीपमधून उभे राहून विवेक कोल्हे शहरात दाखल होताच अनेक जेसीबी मशीनच्या लोडरमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत अनेक कार्यकर्ते उंट आणि घोड्यावर बसून सामील झाले. शहरातील छत्रपती शिवाजी स्मारक येथे या मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी कोल्हे यांनी बँडच्या तालावर ठेका धरला आणि भर चौकात दंड थोपटले, मिशांना पीळ दिला आणि ‘पुष्पा’ स्टाईल करत हटके अंदाज पाहायला मिळाला.

    कोपरगाव शहरात जणू भाजप कार्यकर्त्यांचा महापूर लोटला होता. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत अनेक जेसीबी उभे करून त्यावरून विवेक कोल्हेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी क्रेनच्या साह्याने 50 फुटी हार घालण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून स्वतः विवेक कोल्हे यांनी देखील बँडच्या तालावर ठेका धरला आणि आनंद साजरा केला. कोल्हेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने संपूर्ण शहर भाजपमय झाले होते.

    कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे असला, तरी विवेक कोल्हे यांच्या विधानपरिषदेवरील एन्ट्रीमुळे भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. ‘कोल्हे’ यांच्या आमदारकीमुळे आगामी निवडणुकीत भाजप अधिक आक्रमकपणे उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत या शक्तीप्रदर्शनातून मिळाले आहेत. “हा विजय कोपरगावच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

    विवेक कोल्हे काय म्हणाले?

    “मी थांबलो होतो त्याचेच फळ आपल्या पक्षाच्या नेत्यांनी मला आज दिलेलं आहे. त्याबद्दल कार्यसम्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप आभारी आहे. आपणही टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानायचे आहेत. मी धन्यवाद धन्यवाद म्हणतो, आपण देवाभाऊ धन्यवाद म्हणायचं आहे. आज मी फार फार काही संवाद साधणार नाही. आपण कोल्हे कुटुंबावर एवढे प्रेम करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमदार म्हणून मला संधी मिळाली आहे. तळागळातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये तुमचं देखील नाव आहे”, असं विवेक कोल्हे म्हणाले.

    “यापुढे आपल्याला कुठलाही अन्याय सहन करायचा नाही. पक्ष सांगेल तिथे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जावून पक्ष संघटना वाढवण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. कुठलाही उतमात आपल्याला करायचं नाही. आलेल्या संधीचं सोनं कामाच्या माध्यमातून करायचं आहे. पुढच्या काही वर्षात आपलं काम बोललं पाहिजे, असं आपल्याला काम करायचं आहे”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा