Pune Nasrapur Case Navale Bridge Traffic : पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे नवले ब्रिजवर रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. मुंबई-सातारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नसरापूरमधील चिमुकलीला संपवल्याप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’, असं म्हणत पुणे शहरात नवले ब्रिज परिसरात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत पुणे वाहतूक विभागाने आज सायंकाळी ७ वाजता तातडीची ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव ब्रिज येथे हॉटेल सुवर्णासमोर आंदोलन सुरू असल्यामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करावा
या परिस्थितीत वाहतूक विभागाकडून वाहनचालकांनी नवले ब्रिजकडे जाणे टाळावे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. जे वाहनचालक आधीच या मार्गावर आहेत, त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे किंवा शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसत असून रास्ता रोको आंदोलन किती वेळ चालणार याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. त्यामुळे पुढील काही काळ तरी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. Pune Crime : पुणे नसरापूर प्रकरण; सीसीटीव्हीत चिमुकली शेवटची दिसली, बॉडी शेणात लपवली; आरोपीची संतापजनक कबुली
नागरिकांमध्ये तीव्र संताप
दरम्यान, नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहेत. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर जबरदस्ती करून तिला संपवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि पीडितेच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आहे. कालपासूनच स्थानिकांकडून आणि राजकीय सामाजिक व्यक्तींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनामुळेमुळे झालेल्या वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि बाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती तपासूनच मार्ग निवडावा, असंही सांगण्यात आलं आहे.
Sunetra Pawar : ‘एक आई म्हणून…’; सुनेत्रा पवारांनी धायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांना लावला फोन, नराधमाच्या फाशीसाठी सीएमसोबत थेट चर्चा
चिमुकलीला न्याय कधी मिळणार?
सध्या नवले ब्रिज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आंदोलन सुरू असल्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. या दोन ते तीन तासांपासून सुरू असलेले हे आक्रमक आंदोलन थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. पोलीस प्रशासनासमोर देखील आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचे मोठे आवाहन उभं राहिलं आहे. आता नागरिकांच्या मागण्या पूर्ण कधी होणार? हे आंदोलन कधी थांबणार? त्या चिमुकलीला न्याय कधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा