Nagpur Dhamangaon Fire : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे भीषण आगीत निम्म्या गावाची राखरांगोळी झाली. या आगीत शेतकऱ्यांच्या गोठ्याला बांधलेली जनावरे दगावली असून अनेकांची घरे जळाल्याने संसार उद्ध्वस्त झाले.
धामणगाव आग बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
अविनाश महाजन, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे भीषण आग लागली. आगीत अर्धे गाव जळून राख झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जळाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ करीत होते. धावपळीत खाली पडून चार ते पाच जण जखमी झाल्याचे कळते.
एका ठिणगीमुळे अर्ध्या गावाचा संसार उघड्यावर
प्राप्त माहितीनुसार, आज शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका शेतात कचरा जाळण्यात आला. याचदरम्यान जोराचे वादळ आले. या वादळामुळे आगीची एक ठिणगी गावातील एका घरावर पडली. संपूर्ण घराला आग लागली. भीषण आगीने एकामागून एक अन्य घरांनाही कवेत घेतले. घरातील जे साहित्य हातात येईल ते घेऊन नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर आले. सैरावैरा पळायला लागले. अर्ध्या गावातील घरांना भीषण आग लागली. याचदरम्यान वीज पुरवठाही खंडीत झाला. नागरिकांनी बादलीतून पाणी टाकून घरांच्या आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीत घरातील साहित्यासह गोठे व धान्यसाठाही जळून राख झाला. Pune Navale Bridge Traffic : नसरापूर प्रकरण; ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’, चिमुकलीचे नातेवाईक आक्रमक, पुण्याच्या नवले ब्रिजवर आंदोलन
आगीने भीषणरुप धारण केले
दरम्यान, भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब तेथे पोहोचले. अरूंद रस्त्यामुळे केवळ दोनच बंब आगीच्यास्थळी गेले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचे रौद्ररूप बघताना नागपुरातूनही अग्निशमन विभागाचे बंब धामणगावकडे रवाना झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. आगीने भीषणरुप धारण केले आहे. अग्निशमन विभागाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. ग्रामस्थांसह जवानरेही सुरक्षित असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली. उशिरारात्रीपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. Pune Crime : पुणे नसरापूर प्रकरण; सीसीटीव्हीत चिमुकली शेवटची दिसली, बॉडी शेणात लपवली; आरोपीची संतापजनक कबुली सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वजण प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा