• Wed. Jun 17th, 2026

    Nasrapur Girl Death : चिमुकलीवर अखेर अंत्यसंस्कार, चार तासांनंतर नवले पूलावरील वाहतूक पूर्वपदावर; नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी हटवलं

    Nasrapur Girl Death : चिमुकलीवर अखेर अंत्यसंस्कार, चार तासांनंतर नवले पूलावरील वाहतूक पूर्वपदावर; नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी हटवलं

    Pune Navale Bridge Traffic : नसरापूरच्या चिमुकलीला न्याय द्या आणि नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी लोकांनी आंदोलन केलं. यासाठी त्या चिमुकलीचं पार्थीव त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं.

    नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी हटवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर प्रकरणातील ‘चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या’, अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आता हटवण्यात आलं आहे. आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हा नवले पूल मोकळा केला. त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर संपलं असून वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं.

    चिमुकलीचं पार्थिव आंदोलन

    भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये काल शुक्रवारी रोजी एका चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने जबरदस्ती करून तिला संपवलं. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ आज शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. चिमुकलीचं पार्थिव रुग्णवाहिकेत ठेवून त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
    Maharashtra TimesNagpur News : जे मिळेल ते घेऊन पळाले, जीव मुठीत धरुन घराबाहेर आले, एका ठिणगीमुळे अर्ध्या गावाची राखरांगोळी; नागपुरातील धामणगावात भीषण आग

    ‘आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या’

    नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. ‘आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या’, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.

    हळूहळू वाहतूक पूर्वपदावर

    आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. परिणामी नवले पूलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. सुमारे चार तास हे आंदोलन सुरू होतं. यावेळी पुण्याचे आयुक्तही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांशी, चिमुकलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. आंदोलक मागे हटत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि नवले पूर रिकामा केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली.

    Maharashtra TimesPune Navale Bridge Traffic : नसरापूर प्रकरण; ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’, चिमुकलीचे नातेवाईक आक्रमक, पुण्याच्या नवले ब्रिजवर आंदोलन

    पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु

    पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणामुळे नसरापूरसह संपूर्ण भोर तालुका हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही जोर धरत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा