Mumbai Water Supply Cut: मुंबईतील 6 वॉर्डमध्ये तब्बल 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. महापालिकेने याबद्दल माहिती दिली असून कोणत्या भागांवर परिणाम होणार याची संपूर्ण यादीही जाहीर केली आहे.
कोणत्या वॉर्डवर परिणाम?
मुंबई उत्तरेत माटुंगा, शीव, वडाळा, दक्षिण भागांत परळ, शिवडी, एल वॉर्डमध्ये कुर्ला, साकीनाका, पूर्व भागात गोवंडी, मानखुर्द, पश्चिमेत चेंबूर आणि एन वॉर्डमध्ये घाटकोपरव, विक्रोळी, आणि विद्याविहार या भागांमध्ये 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 मे, मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 मे, बुधवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
Mumbai News: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रोडमुळे प्रवास सुस्साट! मुंबईतील कोंडी फोडणारे मार्ग कधी सुरू होणार?
बोगद्याच्या कामासाठी पुरवठा बंद
मुंबई महापालिकेने वडाळ्यातील अमर महल ते प्रतीक्षा नगरपर्यंत एका नवीन बोगद्याचं काम हाती घेतलं आहे. हा नवा बोगदा परळ, ट्रॉम्बे जलाशयाला जोडणार आहे. पुढे जाऊन तुर्भेतील उच्च स्तरीय जलाशयापर्यंत या बोगद्याचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये 1,800 मीमी व्यासाच्या बोगद्यासह इतर संबंधित कामे केली जाणार आहेत. या बोगद्याचं बांधकाम सुलभ करण्यासाठी तुर्भे येथील उच्च-स्तरीय आणि निम्न-स्तरीय जलाशयांमधील पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. या 30 तासांच्या कालावधीत हे काम संपवून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल. त्यामुळे या काळात रहिवाशांनी पुरेसे पाणी साठवून ठेवून पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.
कोणत्या विभागांमध्ये पुरवठा बंद राहील?
एफ/उत्तर वॉर्ड: प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एच.एम. रोड, के. डी. गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, अल्मेडा कॉम्प्लेक्स, शीव पूर्व आणि पश्चिम.
एफ/दक्षिण वॉर्ड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटीट मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बीजे देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, खाशाबा मार्ग, महादेव पालव मार्ग, जिजीभॉय लेन, आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भटंकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली.
Thane News: मुंबई, ठाणे ते समृद्धी महामार्ग वेगवान प्रवास शक्य! 21 किमी लांब उन्नत मार्गामुळे प्रवाशांना फायदा; कुठे असेल मार्ग?
एल वॉर्ड: साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, न्यू टिळक नगर, कुरेशी नगर, हिल मार्ग, ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, पंचशील नगर, नेहरू नगर, शिव सृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व केदारनाथ मंदिर रोड, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस कॉलनी, कुर्ला कारशेड, रेल्वे कॉलनी, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर, एव्हरार्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा कॉलनी, समर्थ नगर.
यासह महापालिकेच्या एम/पूर्व वॉर्ड आणि एम/पश्चिम वॉर्डातील पुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
