• Sun. Sep 6th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज पाहा फक्त एकाच ठिकाणी


Latest Marathi News: राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करत केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुक्रवारी मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना-२०२७अंतर्गत १ मेपासून प्रथम टप्पा अर्थात स्व-गणनेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यपालांनी मुंबई येथील लोकभवन या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला. तर मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून नोंद केली. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे उष्णतेच्या लाटांच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये सरासरीपेक्षा कमी उष्णतेच्या लाटा येतील, असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणाच्या तुरळक भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीहून अधिक असू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed