• Sun. Jun 14th, 2026
    Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले तर प्रवास महागणार, संजय राऊत यांचा दावा

    पेट्रोल-डिझेलचे दर आगामी काळात महागणार असल्याचे दावे केले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तर प्रवास महागणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : देशात व्यवसायिक LPG सिलेंडरचे दर वाढले आहेत. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल यांचेदेखील दर वाढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसं झालं तर प्रवास महागणार असल्याची शक्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवली आहे. “पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले तर प्रवास महागणार आहे. हवाई प्रवास, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार, जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे तिथे महागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, सब कुछ ठिक आहे. पण सब कुछ ठिक नाही. ते फक्त सर्व काही ठिक निवडणुकांचे मतदान होईपर्यंत असतं. आता यापुढे नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. “आता मतदान संपलं आहे. आता सर्व महाग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणणार आंतरराष्ट्रीय स्थिती आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

    “पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 180 ते 185 विधानसभा मतदारसंघांमध्ये जिंकून बहुमतात निवडून येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोणताही आत्मविश्वास असू शकतो. आत्मविश्वासाला काही कुलूप लावलेलं नाही. माणसाने खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या आत्मविश्वासाला काय झालं? ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आहे ते पाहून मला असं वाटतं की, ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

    “वांद्रा खाडीतील जमीन हरितकरणासाठी ठेवली होती. ग्रीन झोन होता तो उद्योगपती गौतम अदानी यांना देऊन टाकला. आता ग्रीन झोनसाठी इतर जमिनींचं अॅक्वोझेशन करत आहेत. हा काय प्रकार आहे? असं मी विचारलं. कुणाचे पैसे तुम्ही उडवताय? आमची जी जमीन होती ती तुम्ही गौतम अदानी यांना दिली. मग आता तुम्हाला नियमानुसार ग्रीन झोन हवा तर तुम्ही इतर जमीन घेत आहात. हा नालायकपणा आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

    “मुंबईत हुतात्मा स्मारकाला तडे गेले आहेत. महाराष्ट्र दिना विषयी आस्था असायला हवी. ज्या 106 हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केला त्यांचे स्मरण करण्याचा कालदा दिवस होता. त्यांच्या स्मारकाला शासनातर्फे तो परिसर सजावट करणं अपेक्षित होतं. त्यांच्या सरकारमध्ये स्वयंघोषित शिवसेना म्हणून जे बसले आहेत, त्यांना तरी असं वाटतं का आम्ही हे केलं पाहिजे. त्यांनी का केलं नाही? आम्ही रात्री बारा वाजता गेलो. आमच्या शिवसैनिकांनी सजावट केली”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा