• Mon. Jun 15th, 2026
    Nagpur Crime : जन्मताच बाळाचा करुण अंत, मानसिक तणाव अन् पतीचा सतत संपत्तीवरुन वाद, आई-लेकीनं स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत काय लिहिलं?

    Nagpur Mother and Daughter End his Life : नागपुरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. नवजात बाळाच्या मृत्यूनंतर मानसिक तणाव वाढला. संपत्तीच्या वादातूनही कौटुंबिक संघर्ष सुरु होता. त्यामुळे आई आणि मुलीने आत्महत्या केली आहे.

    नागपूर आई मुलीने आयुष्य संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई आणि लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये संगीत ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (विवाहित मुलगी) यांचा समावेश आहे. दोघीही नागपूरमधील नंदनवन परिसरात एकत्र राहत होत्या. बुधवारी उशिरा रात्री त्यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याचं समोर आले आहे. ही घटना समोर येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना खाली उतरवून रुग्णालयात पाठवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    आई आणि लेक मानसिक तणावात

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हे हिचे सुमारे दोन वर्षांपूर्वी लोकेश ब्रम्हे याच्यासोबत लग्न झाले होते. काही महिन्यांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला होता, परंतु दुर्दैवाने त्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आकांक्षा गंभीर मानसिक तणावाखाली होती आणि ती आईकडे राहण्यासाठी आली होती. दरम्यान, आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे हा संपत्तीच्या कारणावरून पत्नी आणि सासूसोबत वारंवार वाद घालत असल्याची माहिती समोर आली आहे. शेती, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीवरून सतत वाद होत असल्याचेही सांगितले जात आहे.
    Maharashtra TimesMumbai Watermelon Deaths : मेंदू, हृदय, आतडं… चौघांचेही अवयव हिरवे, मुंबईतील विषबाधा केसला कलाटणी, सात वर्ष जुन्या साक्षीशी संबंध?
    30 एप्रिलच्या रात्रीही लोकेश ब्रम्हे घरी आला होता आणि त्यावेळी वाद झाला होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. या सततच्या वादामुळे आणि मानसिक तणावामुळे आई-लेकीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपला अंत्यसंस्कार गावात वडिलांच्या ठिकाणी करण्याची इच्छा व्यक्त केली असून सासरच्या नातेवाईकांकडे मृतदेह देऊ नये, अशीही नोंद केल्याचे समजते.
    Maharashtra TimesPune News : कोंढव्याची तुलना कराचीसोबत? व्हिडिओने पुण्यात वाद पेटवला, भाजप पदाधिकारी सर्वेश मेहेंदळेंवर गुन्हा

    आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय

    नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून पती लोकेश ब्रम्हे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास नंदनवन पोलिस करत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा