Nagpur नागपूरमध्ये घरात खेळत असताना ११ वर्षीय मुलासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूरच्या प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ११ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मल्हार अनमोल रंगारी (वय ११) असे मृत मुलाचे नाव असून, घरात खेळत असताना झालेल्या अपघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मल्हार हा सहाव्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात, तर आई बँकेत कार्यरत आहे. घटनेच्या वेळी आई-वडील दोघेही कामावर गेले होते. घरात मल्हार, त्याची मोठी बहीण आणि आजी उपस्थित होते.
नेमकी कशी घडली घटना ?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास मल्हार आणि त्याची बहीण घरात खेळत होते. काही वेळानंतर मल्हार एका खोलीत गेला आणि त्याने दार आतून बंद केले. बराच वेळ उलटूनही तो बाहेर न आल्याने बहिणीने दार ठोठावून हाक मारली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने आजीला बोलावले. त्यानंतर दुसऱ्या किल्लीच्या साहाय्याने खोलीचे दार उघडले असता मल्हार बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा अडकलेला असल्याचे दिसून आले. ही माहिती तातडीने त्याचा आई-वडिलांना देण्यात आली. शेजाऱ्यांच्या मदतीने मल्हारला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांचा काय अंदाज?
घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली आणि पंचनामा केला. प्राथमिक तपासात, मल्हारने कुतूहलापोटी खिडकीला बांधलेला पट्टा गळ्यात घातल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी तो चाके असलेल्या खुर्चीवर उभा होता. अचानक तोल गेल्याने खुर्ची सरकली आणि गळ्यातील पट्टा आवळला गेल्याने त्याचा गळफास लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रंगारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा