Three Youth Died in Chhatrapati Sambhajinagar Tembhapuri Dam : छत्रपती संभाजीनगरमधील टेंभापुरी येथे तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त होत आहे.
टेंभापुरी धरण तिघांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर, सुशील राऊत : छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथील टेंभापुरी धरण परिसरात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. धरणात पोहण्यासाठी गेलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथील तीन तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर या तिन्ही तरुणांचे पार्थिव बाहेर काढले असून, वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले
शैलेश जोगदंड (वय 25), शैलेश वेळेसकर (वय 24) आणि आविष्कार लोखंडे (वय 25) तिघेही राहणार रांजणगाव शेणपुंजी MIDC अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रांजणगाव शेणपुंजी येथील तीन मित्र फिरण्यासाठी टेंभापुरी धरण परिसरात गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही धरणात बुडू लागले. पोलीस अंमलदार अमोल रमेश गायकवाड यांनी या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन केंद्राला दिली. घटनेची माहिती मिळताच कांचनवाडी आणि पदमपुरा अग्निशमन केंद्राची पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोधमोहीम राबवली. पाण्याचा खोलवर अंदाज घेत जवानांनी तिन्ही तरुणांचे पार्थिव बाहेर काढले. Milind Narvekar : राजकारणातील ‘मिसिंग लिंक’, मिलिंद नार्वेकरांनी कौटुंबिक सोहळ्यात केली ‘कनेक्टिंग लिंक’
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
मयत तरुणांचे पार्थिव वाळूज पोलीस स्टेशनचे अमोल गायकवाड आणि शेळके यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन सुटीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Nagpur Accident: मुलीच्या लग्नाला १० दिवस बाकी असताना आईचा दुर्दैवी अंत; भरधाव वाहनाच्या धडकेत जागीच ठार
सेल्फीच्या मोहाने होत्याचं नव्हतं झालं
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घातली आहे. जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात भोसरीतील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. तसेच, याच दिवशी पवना नदीतही एका तरुणाचा बळी गेला आहे. अशा प्रकारे मावळमध्ये एकाच दिवसात पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा