• Sat. Jun 6th, 2026
    Milind Narvekar : राजकारणातील ‘मिसिंग लिंक’, मिलिंद नार्वेकरांनी कौटुंबिक सोहळ्यात केली ‘कनेक्टिंग लिंक’

    Milind Narvekar Naresh Mhaske Son Wedding : ठाण्यात शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेनेचे (उबाठा) आमदार मिलिंद नार्वेकर यांची हजेरी लावली.

    मिलिंद नार्वेकर लग्न हजेरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    विनित जांगळे, ठाणे : राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. पक्षामध्ये उभी फूट पडली. तरीही कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय नेतेमंडळी एकत्र येत असल्याचे प्रसंग घडतात. मात्र दोन्ही शिवसेनेची स्वतंत्र वाटचाल सुरु झाल्यानंतर या दोन्हीही पक्षांच्या नेत्यांमध्ये संवादाचे पूल कोसळल्याचे चित्र होते. या परंपरेला छेद देत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार आणि विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी थेट ठाण्यातील शिंदेंचे निकटवर्तीय शिलेदार खासदार नरेश म्हस्के यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे राजकारणातील ही ‘मिसिंग लिंक’, मिलिंद नार्वेकरांनी कौटुंबिक सोहळ्यात ‘कनेक्टिंग लिंक’ केल्याचे चित्र दिसून येत आहे.

    सोहळ्याला संजय राऊत यांची हजेरी

    कितीही टोकाचे मतभेद असले तरी, कौटुंबिक नातेसंबंध राखण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचा प्रत्यय ठाण्यात आला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचे सुपुत्र उद्योजक आशुतोष म्हस्के यांचा हर्षदा यांच्याशी विवाह संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभ सोहळ्याला संजय राऊत यांनी हजेरी लावली. त्याची चांगलीच चर्चा समाज माध्यमावर रंगली. मात्र त्याआधी बुधवारी झालेल्या या शाही विवाह सोहळ्याला मिलिंद नार्वेकर हजर होते. त्यांनी नवदाम्पत्याला पुष्पगुच्छ देत वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी म्हस्के यांनी शाल व पुष्पगुच्छ देत नार्वेकर यांचा सन्मान केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ कौटुंबिक चर्चाही रंगल्या.
    Maharashtra TimesSanjay Raut: कट्टर विरोधक, मात्र कौटुबिंक सोहळ्यात हजेरी; नरेश म्हस्केंच्या मुलाच्या लग्नात संजय राऊतांच्या एण्ट्रीने उंचावल्या भुवया!

    सर्वपक्षीय जवळीक पक्षासाठी ‘संकटमोचक’

    दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने (उबाठा) उमेदवार रिंगणात उतरवल्याने काँग्रेसनेही शड्डू ठोकले होते. यावेळी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांशी नार्वेकर यांनी तातडीने बैठक घेत हा गुंता सोडवल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी विधान परिषदेच्या रिंगणातून माघार घेतली. अशाच प्रकारे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेली नार्वेकर यांची जवळीक नेहमीच पक्षासाठी ‘संकटमोचक’ ठरत आहे.
    Maharashtra TimesMumbai-Pune Missing Link : मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक! मुंबई-पुणे अंतर 30 मिनिटांनी कमी; दररोज 1 कोटींच्या इंधनाची बचत

    राज ठाकरेंचा संताप

    दरम्यान, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मात्र, यावेळी स्मारकाची अवस्था पाहून राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ‘हा दिवस सरकारी औपचारिकता म्हणून साजरा केला जात असून, स्मारकाबाबत सरकारची अनास्था स्पष्टपणे जाणवत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा