• Sun. Jun 7th, 2026

    महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले ध्वजवंदन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2026
    महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले ध्वजवंदन – महासंवाद

    मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

    मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, मुंबई पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी पालकमंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, तहसीलदार दिलीप रायण्णावार, प्र. उपजिल्हाधिकारी विनायक पाडवी, नायब तहसीलदार राकेश दाभाडे, निवासी नायब तहसीलदार श्रीनिवास जाभंळे तसेच कामगार आयुक्तालय अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा पर्यवेक्षक संजय शिवाजी गायकवाड, सुरक्षा रक्षक वसंत परब, संजय सोलीम, संतोषा तोडकरी, नवनाथ सर्जिने, धनाजी पाटील, उमेश इंगळे यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

    त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणारा सन 2020-21 चा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ॲड. स्मिता चव्हाण यांना, सन 2021-22 चा सौ. स्वप्ना यशवंत सरपे यांना सन 2022-23 चा डॉ. स्मिता रणजित काळे यांना आणि सन 2023-24 चा पुरस्कार श्रीमती अनघा साटम यांना मंत्री श्री. शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    यावेळी मुंबई पोलीस पथकाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed