• Sat. Jun 20th, 2026

    बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 30, 2026
    बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य – महासंवाद

    मुंबई, दि. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकीसेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा तयारीसाठी एकरक्कमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या परीक्षेस पात्र असलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

    या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्च पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहन मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती  http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील NOTICEBOARD विभागातील Maharashtra Public Service Commission Electrical Engineering Services Mains Examination 2025 या लिंकवर उपलब्ध आहे.

    0000

    शैलजा पाटील/ वि.सं.अ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed