Chhatrapati sambhajianagar crime: जर तू कोणाला याबाबत सांगितलं, तर तुझे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मी व्हायरल करेन, असं बोलून त्याने विवाहितेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
३५ वर्षीय विवाहित महिला सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेमात पडली; लॉजवर जाऊन शरीरसंबंध, पण नंतर…; धक्कादायक घटना उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियाच्या आभासी जगात मैत्री शोधणं एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचं नाटक करून एका उपअभियंत्याने महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी हिंगोली येथे कार्यरत असलेल्या एका उपअभियंत्यावर गुन्हा दाखल केला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर उपअभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, आखाडा बाळापूर, जि. हिंगोली इथे कार्यरत होता.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उपअभियंत्याची पीडित महिलेशी जुलै २०२५ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. संवादाचे रूपांतर हळूहळू जवळीकीत झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्नाचं आमिष दाखवून प्रेमाचं नाटक रचलं. १६ जुलै रोजी आरोपीने पीडितेला कॉफी पिण्याच्या बहाण्याने बोलावले आणि आपल्या आलिशान कारमधून फिरवले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे पतीला धमकी
जेव्हा पीडितेने लग्नाचा तगादा लावला, तेव्हा आरोपीने आपलं खरं रूप दाखवलं. आरोपीने त्यांच्यातील व्हॉट्सॲपवरील खाजगी संभाषण पीडितेच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. जर तू कोणाला काही बोललीस, तर तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, असं म्हणत त्याने पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केलं. जुलै ते ऑक्टोबर २०२५ या दरम्यान हा शोषणाचा प्रकार सुरू होता.
सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल
आरोपीच्या सातत्यपूर्ण त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडितेने धाडस करत सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपअभियंता याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. उच्चशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनेच अशा प्रकारे कृत्ये केल्याने शासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा