• Thu. Jun 18th, 2026

    Nashik Crime: सत्तर कोटींची बनवेगिरी उघड; कार्यारंभ आदेशांवर कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही, गुन्हा दाखल

    Nashik Crime: सत्तर कोटींची बनवेगिरी उघड; कार्यारंभ आदेशांवर कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही, गुन्हा दाखल

    Nashik Crime: ​​नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण आले आहे.

    नाशिक कुंभमेळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्यातील ३५ कोटींच्या सीसीटीव्ही सर्वेक्षण कामाचा कार्यारंभ आदेश, तसेच ‘एआय’ आधारित सुरक्षेबाबतच्या ३५ कोटींच्या परवानगीपत्रावर खुद्द सिंहस्थ प्राधिकरण अध्यक्षांचीच बनावट डिजिटल स्वाक्षरी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सत्तर कोटींची बनवेगिरी उघड झाली आहे.

    नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यहार आणि कमिशनखोरीचा आरोप झाल्यानंतर आता सिंहस्थ प्राधिकरणाच्या लेटरहेडवर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून कार्यारंभआदेश काढल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सिंहस्थ कामांतील निविद प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, सर्वच निविदा आणि कार्यारंभ आदेशांची पडताळणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesNashik News: ​​’मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडतेस,’ घरात शिरुन नाशकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रोडरोमियो गजाआड
    सिंहस्थानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास ३० हजार कोटींची कामे सुरू आहेत. ही कामे वादात सापडली असताना गेल्या महिन्यात मंत्रालयातील लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यवहार आणि ‘कमिशन फिक्स’ झाल्याचे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.

    त्यात कुंभमेळामंत्री ते अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली बसविणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा व देखरेख व्यवस्था पुरविण्याबाबतचे सत्तर कोटींचे कायर्यादेश व परवानगीचे पत्र सिंहस्थ प्राधिकरणाच्या लेटरहेडवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीने तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील डॉ. गेडाम यांचे स्वीय सहायक विजय सोनवणे यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने खळबळ उडाली आहे.
    Maharashtra TimesNashik Crime: देवळाली कॅम्पच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये चोरी; तब्बल 82 लाखांच्या इन्शुलिन इंजेक्शन्स गायब
    कार्यादेश-पत्रावर प्रत्येकी ३५ कोटींची रक्कम

    कुंभमेळा प्राधिकरणाचे वेगवेगळे जावक क्रमांक टाकून २० जानेवारी आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी ही कागदपत्रे ठाण्यातील इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सीचे संचालक व संस्थापक अभिषेक संजय झरे यांच्या नावे दिल्याचे दर्शविण्यात आले आहे. दोन्ही कार्यदादेश आणि पत्रावर प्रत्येकी ३५ कोटी अशी सत्तर कोटी रुपये रक्कम नमूद असून, पत्रावर डॉ. गेडाम यांची डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    स्वाक्षरीत आढळली विसंगती

    सोमवंशी यांनी दोन्ही पत्रांमधील मजकूर तपासला. पत्राच्या टायपिंगमधील मार्जिन, प्रकल्पाची मंजूर रक्कम आणि विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या स्वाक्षरीमध्ये असलेल्या विसंगतीबाबत त्यांना संशय आला. त्यांनी या पत्राच्या प्रती आणि पीडीएफ फाइल डॉ. गेडाम यांना दाखविल्या. गेडाम यांच्या नेहमीच्या डिजिटल स्वाक्षरीतील स्पेलिंग Praveen Nilkanthrao Gedam असे असते. परंतु, या कार्यादेशावरील डिजिटल स्वाक्षरीत Pravin असे स्पेलिंग असल्याने ही अधिकृत डिजिटल स्वाक्षरी नसल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesNashik MHADA Scam: म्हाडा घरकुल घोटाळ्यात 26 लेआउट रद्द; नगररचना विभागाचा बिल्डरांना दणका
    ..यामुळे बळावला संशय
    सिडकोतील निळकंठ शेवाळे मंगळवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात सोनवणे यांना भेटले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली बसविणे, कार्यान्वित करणे व देखभाल करण्याबाबतच्या कार्यदिशाची प्रत आणि कृत्रिम व्यवस्था बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा व देखरेख त्यांच्याकडील अधिकृत कार्यदिश व पुरविण्याबाबतचे परवानगीपत्र त्यांनी दाखविले. ही दोन कागदपत्रे खरी आहेत की बनावट याची पडताळणी करून घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन पाटील चव्हाण यांनी ही कागदपत्रे आपल्याला दिल्याची माहिती त्यांना दिली. सोनवणे यांनी कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे कामकाज पाहणारे सहाय्यक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांच्याकडे त्यांना पाठविले. त्यांनी हे कार्यादेश आणि परवानगीचे पत्र तपासले असता ते बनावट असल्याची खात्री पटली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा