• Sat. Aug 8th, 2026

    Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

    Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांच्या संथ गतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कुंभ कामांची सद्यःस्थिती समाधानकारक नाही. महिनाभरानंतर होणाऱ्या पुढील आढावा बैठकीपर्यंत गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसलीच पाहिजे,” असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी यंत्रणेला दिला.

    सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशांतून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि समन्वयाच्या कामांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

    Devendra Fadnavis: फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानेच सरकारविरोधात थोपटले दंड; नरेंद्र पाटलांचा संताप, राजीनाम्याचा इशारा!
    निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरातील खड्ड्यांवरूनही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. खड्डे बुजवण्याची जबाबदारी असणाऱ्यांकडून दंड आकारा आणि आवश्यक असल्यास त्यांची पुढील कामे थांबवा, असे निर्देश त्यांनी दिले. “इतका मोठा खर्च करूनही नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असेल, तर आपण कुठे चुकतो आहोत, याचे आत्मपरीक्षण करा,” असेही ते म्हणाले.

    हरिद्वार अर्धकुंभाकडे आखाड्यांचे लक्ष

    त्र्यंबकेश्वर : येथील आखाड्यांचे लक्ष उत्तराखंडमधील हरिद्वार येथे होणाऱ्या अर्धकुंभाकडे लागले आहे. बहुतांश साधू-महंत कुंभपूर्व तयारीसाठी हरिद्वारमध्ये दाखल झाले आहेत. जानेवारी ते मे २०२७ दरम्यान तेथे कुंभस्नानाचा पर्वकाल असेल. अमृतस्नानानंतर आखाडे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesSunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूरखड्ड्यांना ‘एमएनजीएल’ जबाबदार

    शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्यांसाठी ‘एमएनजीएल’च्या गॅस पाइपलाइन कामांना जबाबदार धरण्यात आले. गॅस कनेक्शनच्या कामात विलंब होत असल्याची गंभीर दखल घेत, वेळेत काम पूर्ण न केल्यास कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

    Maharashtra TimesTukaram Mundhe : शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, हॉटेल्समध्ये कीटकांचा वावर, स्वयंपाकघरात झुरळे; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची कारवाई‘कंत्राट देताना जात-भाषा पाहिली जात नाही’

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. सिंहस्थच काय, कोणतीही कंत्राटे देताना कोणाचीही जात, भाषा किंवा धर्म पाहिला जात नाही. काम पूर्ण करण्याची क्षमता आणि निविदेतील पात्रता यावरच कंत्राट दिले जाते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. फडणवीस म्हणाले की, कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. एखादी कंपनी कोणत्या राज्यातील आहे, यापेक्षा तिची काम पूर्ण करण्याची क्षमता, तांत्रिक पात्रता आणि निविदेतील अटी महत्त्वाच्या असतात. स्पर्धात्मक पद्धतीने कमी दरात कंत्राटे देण्यात आली आहेत. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी तीन स्तरांवर यंत्रणा उभारण्यात आली असून, तपासणी समाधानकारक झाल्यानंतरच कंत्राटदारांना पैसे दिले जातील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली
    Washim Crime : नवऱ्याचे अनैतिक संबंध, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं, गर्भवती बायकोला संपवलं; मराठा बटालियनमध्ये कार्यरत जवानाचं संतापजनक कृत्य
    Tukaram Mundhe FDA : छ. संभाजीनगरचं पथक बीडमध्ये पोहोचलं, तुकाराम मुंढेंची थेट आपल्याच जन्मभूमीत कारवाई; छापा मारताच धक्कादायक बाबी समोर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed