• Fri. Sep 11th, 2026
महाराष्ट्रातील दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी


Latest Marathi News: विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुधवारी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दानवेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत स्वातंत्र्यानंतरच्या विक्रमी मतदानाचा कल बुधवारी दुसऱ्या टप्प्यातही कायम राहिला. महिलांनी ९२ टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने मतदानात सक्रिय सहभाग नोंदविला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार रात्री ८पर्यंत राज्यात ९१.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात, २३ एप्रिल रोजी ९३.१९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे एकत्रित मतदानाचा टक्का ९२.४७ इतका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed