London School Of Economics: पहिल्या दहा वर्षांत या अध्यासनासाठी या संस्थेतील विद्यमान प्राध्यापकांतून निवड केली जाईल. त्यानंतर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या निवड प्रक्रियेद्वारे भरती केली जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय, संविधानिक लोकशाही, आर्थिक समता आणि मानवी हक्कांच्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण व्हावे, हा अध्यासन स्थापन करण्यामागील उद्देश आहे. अध्यासनात संविधान आणि लोकशाही, सामाजिक समता, आर्थिक लोकशाही आणि पुनर्वितरण धोरणे, श्रमिक हक्क आणि सामाजिक संरक्षण, संघराज्यवाद आणि सार्वजनिक वित्त, समावेशक शासन व्यवस्था आदी विषयांवरील आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Kolhapuri Chappal: ‘कोल्हापुरी’ची करकर जगभरात! सामंजस्य करारानंतर 40 स्टोअरमध्ये चपलांची विक्री
राज्यघटना अध्ययन, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरण या विषयांत प्रगत संशोधन करणे, वार्षिक व्याख्यानमाला, परिसंवाद आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे, लोकशाही आणि समावेशक विकासविषयक शैक्षणिक प्रकाशने आणि संशोधनाला चालना देणे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था संशोधकांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवणे ही अध्यासनाची उद्दिष्ट्ये असतील. बाबासाहेबांचा बौद्धिक वारसा असलेल्या विधि, शासन, आंतरराष्ट्रीय विकास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र आणि पब्लिक पॉलिसी या विषयांतील विद्वान प्राध्यापक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कार्यरत आहेत.
वैशिष्ट्ये काय ?
-अध्यासनासाठी तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय विकास, शासन प्रशासन, विधि आणि सामाजिक धोरण असे विभाग असतील
-अध्यासन स्थापनेसाठी ३० लाख पौंड (३७ कोटी १३ लाख ८२ हजार ३०० रुपये) एकरकमी निधी दिला जाणार
-लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, महाराष्ट्र शासन आणि ‘बार्टी’ यांच्या समन्वयाने दहा पीएचडी शिष्यवृत्ती देण्यास मान्यता
-पीएचडीचा कालावधी चार वर्षांचा असेल. पहिली शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२७-२८पासून आणि दुसरी शिष्यवृत्ती २०२९-३० मध्ये सुरू होणार -शिष्यवृत्तीसाठी प्राप्त अर्जाची छाननी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या समितीद्वारे केली जाणार
-राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी या योजनेंतर्गत अर्ज करण्याची इच्छा स्पष्ट नमूद करणे आवश्यक असेल
-त्यांचे अर्ज लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील विभागांकडून विचारात घेतले जातील संबंधित
-सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग आणि ‘बार्टी’ यांच्यामार्फत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आणि त्यांनी निवडलेल्या विभागांची माहिती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला कळविली जाईल
-शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जाची छाननी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या समितीद्वारे केली जाईल
अर्थसाह्य असे…
पहिल्या दहा शिष्यवृत्तींसाठी महाराष्ट्र शासन, बार्टी आणि लंडन स्कूल इकॉनॉमिक्स यांच्यादरम्यान ५०:५० प्रमाणात अर्थसाह्य करण्यात येणार आहे. २०२७-२८ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख ९१ हजार ३१७ पौंड म्हणजेच दोन कोटी ३६ लाख ८३ हजार ९१६ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी निम्मा म्हणजेच १ कोटी १८ लाख ४१ हजार ९५८ रुपयांचा निधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून देण्यात येणार आहे.
सामंजस्य करार करण्यास मंजुरी
शिष्यवृत्ती कार्यक्रम राबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यांच्याबरोबर सामंजस्य करार केला जाईल. हा करार करण्यास, त्यानंतर अंतिम करार करण्यास आणि इतर आवश्यक परवानग्या घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
