AC Local Trains: पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमुळे सर्वाधिक महसूल प्राप्त होतो आहे. त्यात वाढत्या उन्हामुळे एसी लोकलची मागणीही वाढली आहे. त्यामुळे हार्बर आणि पश्चिमवर वाढीव लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१२ एसी फेऱ्या वाढणार
उन्हाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन एसी लोकल दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर १२ एसी फेऱ्यांसह १५ डबा लोकलच्या १७ फेऱ्याही वाढणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच विरार-डहाणूदरम्यान ही वाढीव आसन क्षमता असलेली लोकल धावणार आहे.
Mumbai Local: पावसाळ्यात मध्य रेल्वेची पुराच्या पाण्यातून सुटका होणार! शीव-कुर्ला स्थानकांवर विशेष लक्ष; पालिकेचं नियोजन काय?
पश्चिम रेल्वेवर सध्याच्या १२ विनावातानुकूलित लोकल रद्द करून त्या जागी १२ एसी लोकल चालवण्यात येणार आहेत. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एकूण चार एसी लोकलची भर पडली आहे. यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या १३३वरून १४५ होणार आहे. सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांना वाढीव फेऱ्या मिळणार आहेत. शनिवार व रविवारी ११८ फेऱ्या उपलब्ध होणार असून, यापूर्वी ही संख्या १०६ इतकी होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/वाशी दरम्यान धावणाऱ्या १४ विनावातानुकूलित लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एकूण दोन फेऱ्यांचा समावेश आहे. हार्बरवरील १४ फेऱ्यांनंतर एकूण फेऱ्यांची संख्या १०८वर पोहोचणार आहे. पश्चिम रेल्वेवर एसीच्या १२४ फेऱ्या आहेत. हार्बरवरील एसी लोकलची रोज सरासरी ४ हजार ४७१ तिकिटांची विक्री होत आहे. तिकीट आणि पासच्या माध्यमातून रोज सरासरी ४० हजार ०१७ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात.
वक्तशीरपणावर लक्ष देणे गरजेचे
हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर एसी फेऱ्या सुरू करताना साध्या लोकलच्या फेऱ्यांच्या वक्तशीरपणावर लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः हार्बरवर एसी लोकलचे दरवाजे उघड-बंद होण्याच्या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे गाड्या विलंबाने धावतात. यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी फेऱ्या वाढवण्यासह साध्या लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
Mumbai-Pune Missing Link: जोखमीच्या वाहनांना ‘मिसिंग लिंक’वर बंदी! मार्गासाठी महत्त्वाचे नियम जाहीर; टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू होणार
विरार-डहाणू मार्गावर
प्रथमच १५ डबा लोकल चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या १२ डब्यांच्या १७ लोकल फेऱ्या आता १५ डब्यांच्या लोकलन चालवण्यात येणार आहेत.
सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत पाच फेऱ्यांचा समावेश आहे. यापैकी आठ फे्या प्रथमच विरार-डहाणू मार्गावर चालवण्यात येणार आहेत. काही कारणांमुळे १५ डब्यांच्या लोकल दोन्ही दिशांनी ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरिन लाइन्स या स्थानकांवर थांबणार नाहीत. या गाड्या दादर स्थानकावर फलाट क्रमांक ४वर दुहेरी थांबा घेतील.
