• Mon. Aug 10th, 2026

    Pune Woman dies during Surgery : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, पुणे : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरातील बाबूरावनगर परिसरात घडली. पूजा राहुल गई असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती राहुल गई यांनी केला आहे.

    दुचाकीवरुन पडल्याने उजव्या हाताला दुखापत

    मंगळवारी (चार ऑगस्ट) दुचाकीवरून जात असताना पडल्याने पूजा यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना बाबूरावनगर येथील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीनंतर त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले.

    फ्रॅक्चरमुळे हातावर शस्त्रक्रियेचा डॉक्टरांचा सल्ला

    त्यानुसार डॉक्टरांनी हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. गुरुवारी (सहा ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. सुमारे तीन तासांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    Maharashtra TimesCrime News : प्रेमात पडून लग्न, पण दहाच महिन्यात बायकोचा इंटरेस्ट गेला, रील्सचं वेड, रात्री संबंधही ठेवेना, पतीने टोक गाठलं

    शवविच्छेदनात नेमकं कारण समजणार

    मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पूजाची बॉडी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे शवविच्छेदन व अन्य तपासणीतून निष्पन्न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

    Maharashtra TimesBengaluru Crime : मुलाचा बालपणी मृत्यू, चाळिशीत नवरा गेला, एकट्या राहणाऱ्या महिलेने बंगल्यात प्राण सोडले, वर्षभर कुणालाच समजलं नाही, शव पाहून पोलीसही हळहळले

    नागपुरात सर्पदंशाने ज्येष्ठाचा मृत्यू

    दुसरीकडे, सर्पदंशाने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरातील वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आठवा मैल परिसरातील गणेशनगर झोपडपट्टी येथे घडली. नारायण गोविंदराव सावंत (वय ६०) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नारायण हे गणेशनगर झोपडपट्टीतील मोकळ्या जागेत तंबू टाकून राहायचे. ४ ऑगस्टला सापाने त्यांना चावा घेतला. नारायण यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.