Chhatrapati Sambhajinagar Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर तीन अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल सोमवारी अपघातांचे दुर्दैवी सत्र पाहायला मिळाले. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे संबंधित गावांवर शोककळा पसरली असून वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त होत आहे.
पहिली घटना:
वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव बु. येथील दोन तरुण दुचाकीने काल सोमवारी मालेगाव येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास नांदगाव जवळील वखारी गावातील वळणावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सलमान नूरमोहम्मद शेख (वय 33) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रियाज गयास शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. सलमान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. Marine Drive Accident: बर्थडे सेलिब्रेशन अखेरचं ठरलं! मुलगा रात्रभर बेपत्ता, आईबापाच्या जीवाला घोर, मरीन ड्राईव्ह अपघातात 19 वर्षीय कृष्णाचा मृत्यू
दुसरी घटना:
दुसरी घटना करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लहुकी फाटा येथे घडली. वरुड काजी येथील रहिवासी जगन्नाथ रावसाहेब दांडगे (वय 36) हे काल सोमवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून एम.एच. 20 एच.जे. 6785 शेतातून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जगन्नाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार असून वरुड काजी गावात हळहळ व्यक्त होत आहे. Mumbai News : ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप
तिसरी घटना:
बिडकीन-पैठण महामार्गावर हॉटेल पार्वतीसमोर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक भरधाव रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये रिक्षातील प्रवासी छाया जनार्दन कोथिंबिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच अपघातात मंगल विलास कोथिंबिरे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच परिसरात दुसऱ्या एका घटनेत दोन दुचाकींच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा