Pratap Sarnaik On Marathi Mandatory : मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा ४ मे रोजीचा संप होणार की टळणार? मराठी भाषेच्या सक्तीवरून सध्या वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संघटनांसोबत चर्चा केली असून सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असं म्हटलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचा विषय खूप चर्चेत आला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलेले आहे. १ मेपासून सर्व अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवसाय करताना मराठी भाषा बोलावी लागणार आहे, असा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात आता राज्यातील परभाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मोर्चा उघडला असून ४ मे रोजी त्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई आणि मुंबईलगतच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या शिष्टमंडळांबरोबर चर्चा केली आहे. या बैठकीनंतर त्यांनी राज्य सरकारची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.
प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, “आम्ही बैठकीचे आमंत्रण देतानाही सांगितले होते की, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. ही राज्य सरकारची भूमिका आहे. तुम्ही या भूमिकेशी सहमत आहात का? त्यांनी यावेळी सहमती दर्शवली. प्रवासी मागे बसतो तेव्हा कुठे जायचे आहे, पैसे किती झाले, इतकी जुजबी मराठी तरी यायला हवी.”
संघटनांची मुदतीची मागणी
दरम्यान, या बैठकीमध्ये विविध संघटनांनी मराठी शिकण्यासाठी मुदत मागितली आहे. तीन महिने, सहा महिने ते एक वर्ष अशा विविध स्वरूपाच्या मागण्या यावेळी संघटनांनी केल्या. या संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. परिवहन मंत्री म्हणून मी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास जुजबी मराठी येणे गरजेचे आहे, या भूमिकेला सर्वांनी समर्थन दिले आहे, असे यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
Mumbai Local : कल्याण-कसाऱ्याच्या प्रवाशांनो, आता गर्दीचं टेंशन सोडा! तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेसह रेल्वेने काढलाय ‘हा’ मोठा तोडगा
त्यांनी पुढे सांगितले की, रिक्षा संघटनांच्या कार्यालयात प्रशिक्षण घेण्याची संघटनांची भूमिका आहे. यामधील काहींनी सांगितले की, हॉल भाड्याने घेऊन त्यामध्ये मराठीचे धडे गिरवू. परंतु या सगळ्यात रोजीरोटीवर टाच येता कामा नये. बंद नको, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
भाषेबाबतच्या भूमिकेवर ठाम
महाराष्ट्र हे प्रतिष्ठित आणि प्रगत राज्य आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यातून राज्यामध्ये रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणाचाही रोजगार बुडावा अशी आमची भूमिका नाही, पण मराठी भाषेबाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
उद्या आरटीओसोबत बैठक
दरम्यान, मुदतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, संघटनांनी मुदत मागितली, पण मी शब्द दिला नाही. उद्या ५९ आरटीओची बैठक आहे. या बैठकीमध्ये त्याबाबत निर्णय घेऊ. शिकवणी हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, मुदत द्यायलाही तयार आहोत. पण मुजोरी चालणार नाही. मुदत दिली आणि मराठी बोलले नाहीत, तर जनता आम्हाला पकडेल, असे सरनाईक म्हणाले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा