• Sun. Jun 7th, 2026
    Amol Mitkari: विधान परिषदेची जागा जय पवार यांना द्यावी! अमोल मिटकरींची ट्विट करत मागणी

    Amol Mitkari On Jay Pawar: अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

    अमोल मिटकरी जय पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक उमेदवार दिला जाणार असून, त्यासाठी पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक इच्छुक पक्षातील शीर्षस्थ नेतृत्वाची भेट घेण्याबरोबरच दबाव आणण्यासाठी विविध गटही बैठका घेत आहेत. त्यातच आमदारकीची मुदत संपत असलेल्या अमोल मिटकरी यांनी या जागेसाठी जय पवार यांचा विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.

    अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जय पवारही राजकारणात सक्रिय झाले असून, नुकत्याच झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी प्रचारात भाग घेतला होता. विधान परिषदेसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार असून, यात राष्ट्रवादीकडून एका जागा लढविण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesMumbai Crime: शुभमंगल ‘सावधान’! मुंबईतील तरुणीला लाखोंना गंडवून नवरदेव पळाला, ४ वर्ष काढलं वेड्यात, प्रकरण काय?
    ‘घराणेशाही वाटेल ते वाटू दे’
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची मोर्चेबांधणी व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू दे, मात्र अजितदादांनंतर भविष्यात हा चेहरा दादांसारखाच आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा संजीवनी ठरेल. अंतिम निर्णय पक्षाचा असेल, असे ते म्हणाले.
    Maharashtra TimesEl Nino Alert: भारतावर मोठं संकट! ‘एल निनो’मुळे हवामानात होणार उलथापालथ, काय सांगतो WMOचा अहवाल
    ‘तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला’
    मुंबई : ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणी कोणाचे नाही. हे फक्त पैशांचे काम आहे. त्यामुळे मते सांभाळा, हा संजय राऊत यांनी दिलेला सल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंना यांना एक प्रकारे दिलेला इशाराच आहे. विधान परिषद निवडणुकीला उद्धव ठाकरे उभे राहिले तर महाविकास आघाडीची मते फुटतील आणि तुमचा पराभव होऊ शकतो . महाविकास आघाडीत तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत,’ अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा