• Tue. Sep 22nd, 2026
शिवाजी कोण होता? पुस्तकाचा विक्रमी खप, पानसरेंच्या मुलीनं संजय गायकवाडांचे आभार मानले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आमदार संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी आणि शिवीगाळ केली.संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे.बुलढाणा येथील मोर्चासाठी कोल्हापुरातील पुरोगामी संघटनाचे कार्यकर्ते कोल्हापुरातून रवाना झाले.छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अभिवादन करून हे सगळे आंदोलन आता बुलढाणाकडे रवाना झाले आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही गोष्ट हास्यास्पद असल्याचे प्रशांत आंबी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed