• Sat. Jun 6th, 2026
    Shivaji Maharaj Book Controversy: वादानंतर 4 दिवसांत 10 हजारांवर प्रतींची विक्री; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाची नव्याने छपाई सुरु

    Shivaji Maharaj Book Controversy: सध्या हे पुस्तक साऊ प्रकाशन संस्थेच्या वतीने पानसरे यांनी जे मूळ पुस्तक लिहिले, ते जसेच्या तसे प्रकाशिक केले जात आहे. काही प्रकाशकांनी पानसरे यांच्या हत्येनंतर त्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रस्तावना वाढवली आहे.

    शिवाजी कोण होता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    गुरुबाळ माळी, कोल्हापूर : नावावरून वाद निर्माण झाल्यानंतर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या चार दिवसांत तब्बल दहा हजारांवर प्रतींची विक्री झाली. सर्व प्रती संपल्याने त्याची नव्याने छपाई सुरू करण्यात आली आहे. या पुस्तकाच्या आतापर्यंत ११५पेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, ३८ वर्षांत वीस लाखांपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. विविध २४ भाषांत या पुस्तकाचा अनुवाद झाला असून, राज्याच्या सर्वच भागांतून त्याला प्रचंड मागणी आहे.

    ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी सन १९८८मध्ये शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिले. ७२ पानांचे हे पुस्तक ‘ लोकवाङ्मय ’ या संस्थेने प्रकाशित केले, तेव्हा त्याची किंमत पाच रुपये होती. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगळी प्रतिमा अतिशय कमी शब्दांत पानसरे यांनी उभी केली. ती वाचकांना प्रचंड भावली. यामुळे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. आमदार संजय गायकवाड यांनी ‘साऊ प्रकाशन’चे प्रशांत आंबी यांना पुस्तकाचे नाव बदलण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

    Maharashtra TimesKolhapur Crime: घरचा माणूस गेला, कुटुंब दु:खात; अंत्यविधीला विकृतानं संधी साधली; 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास
    प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. यामुळे नावावरून हे पुस्तक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. यामुळे या पुस्तकाविषयी पुन्हा उत्सुकता निर्माण होऊन त्याला मागणी वाढली. चार दिवसांत दहा हजारांवर प्रती खपल्या. राज्यभरातून प्रकाशकाकडे चौकशी सुरू झाली. प्रती संपल्याने तातडीने या पुस्तकाची छपाई सुरू करण्यात आली आहे.

    चार संस्थांकडून पुस्तकाचे प्रकाशन
    ‘लोकवाङ्मय’, ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘समाजवादी प्रबोधिनी’ आणि ‘साऊ प्रकाशन’ या चार संस्थांच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन केले जात आहे. पुस्तकाच्या नावावरून आतापर्यंत अनेकदा वाद झाला; पण पानसरे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यावर पडदा पडत गेला.

    Maharashtra Times‘ही धोक्याची घंटा, आज नकाशा काढला, उद्या शिवाजी महाराजांवर पडदा पडू शकतो’, राजमाता Kalpanaraje Bhosale आक्रमक
    चार दिवसांत पुस्तकाला प्रचंड मागणी वाढली आहे. एक हजार, दोन हजार अशा ऑर्डर येत आहेत. पण, सध्या सर्व पुस्तके संपल्याने नव्याने छपाई सुरू करण्यात आली आहे. –प्रशांत आंबी, प्रकाशक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा