एमएमआरडीएने मेट्रो मार्गिका 6 साठी निर्णायक टप्पा गाठला आहे. पश्चिम रेल्वेच्या कार्यरत असलेल्या मार्गावर अवघ्या 10 तासांचा ब्लॉक घेऊन एमएमआरडीएने मोठा पल्ला गाठला आहे. ही कामगिरी वाटते तितकी सोपी नव्हती. पण एमएमआरडीएने हा महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे १४.५ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठत, या मार्गावरील अत्यंत जटिल कामांपैकी एक यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वेच्या कार्यरत मार्गावर अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वाच्या पियरची उभारणी तसेच पहिल्या स्टील कॉम्पोझिट स्पॅनची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
लांबी : १४.५ किमी (पूर्णपणे उन्नत)
स्थानके : १३
लाईन रंग : पिंक लाईन
डेपो : कांजूरमार्ग (१५.२ हेक्टर)
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मार्गावर मेट्रो लाईन ६ सोबत डबल डेकर उड्डाणपूल
सद्यस्थिती : ८७.७% सिविल काम पूर्ण
सक्रिय रेल्वे मार्गातील गुंतागुंतीचे उपसंरचना काम
या टप्प्याची सुरुवात पियर P124 च्या उभारणीने झाली, जो मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या उपनगरी रेल्वे मार्गांपैकी एका मार्गावरील अप-थ्रू आणि डाउन-थ्रू ट्रॅकदरम्यान स्थित आहे. अत्यंत मर्यादित जागा आणि उच्च जोखमीच्या परिस्थितीत हे काम करताना काटेकोर नियोजन, समन्वय आणि कठोर सुरक्षा निकषांचे पालन आवश्यक होते. पायाची कामे आणि पियर कॅप स्तरापर्यंतची सर्व कामे रेल्वेच्या सुरक्षा मानकांनुसार आणि मंजूर निकषांनुसार पूर्ण करण्यात आली. दोन्ही बाजूंनी सतत रेल्वे वाहतूक सुरू असतानाही कोणताही व्यत्यय न आणता हे काम पार पाडण्यात आले.
या टप्प्यातील प्रमुख आव्हाने अशी होती :
रात्रीच्या मर्यादित वेळेत काम करणे
सतत सुरू असलेली रेल्वेची अखंडित वाहतूक
अत्यंत नियंत्रित अंमलबजावणी आणि बारकाईने देखरेख
सुरक्षा निकषांचे कठोर पालन
४२ मीटर स्टील कॉम्पोझिट गर्डर स्पॅनची उभारणी
पियर P124 पूर्ण झाल्यानंतर, पियर P123 आणि P124 दरम्यान पहिला स्टील कॉम्पोझिट गिर्डर स्पॅन उभारण्यात आला.
या स्पॅनची वैशिष्ट्ये
लांबी : ४२ मीटर
वजन : सुमारे १६८.९६ मेट्रिक टन
रचना : मुख्य गर्डर्स , क्रॉस गर्डर्स आणि ब्रेसींग घटकांचा समावेश असलेली कॉम्पोझिट स्टील प्रणाली
ही उभारणी सुमारे १० तासांच्या नियोजित रेल्वे ब्लॉकमध्ये पूर्ण करण्यात आली, ज्यातून नियोजन आणि अंमलबजावणीची उच्च कार्यक्षमता दिसून येते.
मर्यादित परीस्थित अत्यंत अचूक क्रेन ऑपरेशन
या कामासाठी ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा समन्वित वापर करण्यात आला. जागेच्या मर्यादेमुळे क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या, ज्यामुळे हे काम अत्यंत जटिल आणि अचूकतेची मागणी करणारे ठरले. सुमारे १०–१२ मीटर उंचीवर हा स्पॅन यशस्वीरित्या बसवण्यात आला आणि सर्व सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले.
पूर्ण काम पुढील बाबींनुसार पूर्ण झाले :
नियोजित रेल्वे ब्लॉक कालावधीत
काटेकोर नियोजन आणि समन्वयासह
सर्व सुरक्षा निकषांचे पालन करून
रेल्वे वाहतुकीवर कोणताही अतिरिक्त परिणाम न करता.
हा टप्पा मेट्रो लाईन ६ वरील सर्वात आव्हानात्मक रेल्वे क्रॉसिंगपैकी एक यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे द्योतक आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वय आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले.
मेट्रो मार्गिका ६ इंटरचेंज कनेक्टिव्हिटी :
आदर्श नगर येथे मेट्रो लाईन २अ
जेव्हीएलआर येथे मेट्रो लाईन ७
सीप्झ परिसरात मेट्रो लाईन ३
कांजूरमार्ग (प) येथे मेट्रो लाईन ४
जोगेश्वरी व कांजूरमार्ग येथे उपनगरी रेल्वे
पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटीला चालना
स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळीला जोडणारी मेट्रो मार्गिका ६ ही शहरातील पूर्व–पश्चिम दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाची प्रकल्प आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. जेव्हीएलआरसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूककोंडी कमी होईल. इतर मेट्रो मार्ग आणि उपनगरी रेल्वेशी एकात्मिक जोडणी होईल. सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध होईल. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणीय शाश्वततेला चालना मिळेल. हा टप्पा एमएमआरडीएच्या दाट शहरी परिसरात अत्यंत जटिल प्रकल्प अचूकता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे.
या टप्प्याचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले, “मेट्रो लाईन ६ हा मुंबईकरांसाठी दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेला अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि यासंदर्भातील नागरिकांच्या अपेक्षा आम्हाला पूर्णपणे जाणवत आहेत. प्रकल्पातील अत्यंत आव्हानात्मक टप्प्यात साध्य झालेली ही प्रगती महत्त्वपूर्ण असून, काम अधिक वेगाने आणि अचूकतेने पुढे नेण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे द्योतक आहे. सध्या या मार्गिकेचे टप्प्याटप्प्याने संचालन सुरू करण्यासाठी विविध पर्यायांचा आम्ही सक्रियपणे विचार करत आहोत, जेणेकरून प्रवाशांना शक्य तितक्या लवकर या प्रकल्पाचा लाभ मिळू शकेल. शहरासाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.”
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा