एनसीईआरटीच्या आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. ही धोक्याची घंटा असल्याचं कल्पनाराजे म्हणाल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी यांनी प्रतिक्रिया दिली. ही धोक्याची घंटा आहे. हे जर असेच चालत राहिले तर कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवर पडदा पडू शकतो. हे चालणार नाही. पृथ्वीतलावर चंद्र, सुर्य, तारे आहेत, तोपर्यंत या देशातील प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज असतील, अशा तीव्र शब्दांत राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्या बद्दल राजघराण्यातून मोठा उठाव झाला आहे. श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच तो नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजमाता कल्पनाराजे भोसले माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे हे प्रकरण गंभीर आहे. ही धोक्याची घंटा आहे. हे जर असेच चालत राहिले तर कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील पडदा पडू शकतो, असं मला वाटतं.
सध्या जे काही सुरू आहे, ते चालणार नाही. पृथ्वीतलावर चंद्र, सुर्य, तारे आहेत. तोपर्यंत या देशातील प्रत्येकांच्या हृदयात, नसानसात छत्रपती शिवाजी महाराज असतील. महाराष्ट्राचा नकाशा इतिहासाच्या पुस्तकातून पुसला जातो. मग, फक्त आम्हीच महाराष्ट्रात आहोत का? तुम्ही पण हिस्सा आहात ना? मग तुमचा आवाज कुठे गेला? असा सवाल राजमाता कल्पनाराजेंनी महाराष्ट्रवासियांना केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या चुलत भगिनी वृषालीराजे भोसले यांनी शुक्रवारी साताऱ्यात जोरदार आंदोलन केले. ‘नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही, इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही’, अशा आशयाचे फलक घेऊन शिवप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा पाठ्यपुस्तकात पुन्हा समाविष्ट न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिलं आहे. संभाजीराजे यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. ” NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे. मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास व राष्ट्राच्या जडणघडणी मध्ये त्यांचे असलेले योगदान भावी पिढीस ज्ञात व्हावे, याकरिता मराठा साम्राज्याचा नकाशा पुनःश्च पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, या मागणीचे सविस्तर पत्र केंद्रीय शिक्षण मंत्री यांस पाठविले आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा