• Fri. Sep 4th, 2026

खरीप पीकविम्याचा रुपयाही मिळाला नाही, फडणवीस सरकारवर नाराजी, शेतकरी संतप्त

खरीप पीकविम्याचा रुपयाही मिळाला नाही, फडणवीस सरकारवर नाराजी, शेतकरी संतप्त


जालना जिल्ह्यातील शेतकरी वर्गात सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झालीय.हेक्टरी १७ हजार रुपये विमा रक्कम देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, असं म्हणत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.अनेक महिने उलटूनही खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इ. पिके वाहून गेली.कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य पीक विमा मिळेल असे आश्वासन दिले होते.मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक दिलासा मिळालेला नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed