Omraje Nimbalkar: वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी बोलून गेली. पक्षांतराबद्दल निर्णय झाला नसल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेसेनेतून फुटलेल्या अन्य ५ खासदारांचीही धडधड वाढवली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे कार चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृहराज्यमंत्री यांच्यासह सगळ्या ९ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तब्बल २० वर्ष जुन्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयानं निकाल दिला. माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर बोलताना पवनराजे यांचे पुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कलियुग आल्याचं म्हटलं. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन दोन दिवसांत निर्णय घेईन, असंही ओमराजेंनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरेसेनेतून फुटलेल्या अन्य ५ खासदारांची धडधड वाढली आहे.
हा निकाल दुर्दैवी असल्याचं म्हणत खासदार ओमराजेंनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. ‘गेल्या २० वर्षांपासून आरोपींना शिक्षा होण्यासाठी आम्ही आणि तपास यंत्रणा अखंडपणे प्रयत्न करत होत्या. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया ओमराजेंनी दिली. हे कलियुग असल्याचं म्हणत कलियुगात वाईटाला जास्त बळ असतं. चांगल्याला लवकर यश मिळत नाही. मी मतदारसंघात जाऊन पुढील निर्णय घेईन, असंही ओमराजे म्हणाले. हा खटला आणि माझ्या राजकीय निर्णयाचा (पक्षांतर) काहीही संबंध नव्हता. मला माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करायची आहे. त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत, असं ओमराजेंनी म्हटलं. Omraje Nimbalkar : पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य लोकसभेत ठाकरेसेनेचे ९ खासदार होते. पैकी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांनी ठाकरेसेनेची साथ सोडली. हे खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार होणारी कारवाई टाळायची असल्यास किमान ६ खासदारांना ठाकरेंची साथ सोडावी लागेल. पण आता निकालानंतर ओमराजेंच्या पक्षांतराबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर फसण्याची शक्यता निर्माण झाली. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना सक्रिय झाली आहे.
न्यायालयाचा निकाल येताच ठाकरेसेनेचे खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ओमराजेंचा विश्वासघात झाला आहे. ते परत येणार असतील, तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं म्हणत देसाईंनी परतीचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले आहेत. ओमराजे माघारी फिरल्यास अन्य ५ बंडखोर कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, माफीचा साक्षीदार फितुर घोषित ‘हा खटला ओमराजे निंबाळकर यांच्या जीवनातील मोठ्या राजकीय संघर्षाचा भाग होता. त्यांना दिलेला शब्द, दिलेली आश्वासनं, ज्या काही गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या असतील. ज्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण आता त्यांचा विश्वासघात झालेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलावं. ते याबद्दल निर्णय घेतील. पण त्यांनी पक्षशिस्त मोडलेली आहे. पक्षाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला,’ याची आठवणही त्यांनी करुन दिली.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा