• Fri. Sep 4th, 2026

Jayshree Thorat : संगमनेरात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचं सामूहिक वाचन; बाळासाहेबांची लेक कडाडली, निशाण्यावर बागेश्वर बाबा आणि महायुतीचे नेते

Jayshree Thorat : संगमनेरात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचं सामूहिक वाचन; बाळासाहेबांची लेक कडाडली, निशाण्यावर बागेश्वर बाबा आणि महायुतीचे नेते

Jayshree Thorat on Sanjay Gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून झालेल्या वादातून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.

संगमनेर जयश्री थोरात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबिन खान, अहिल्यानगर (संगममेर) : सध्या महाराष्ट्रभरात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना, संगमनेरमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे सामूहिक वाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

सामूहिक वाचनाचे आयोजन

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी संगमनेरमध्ये जनसागर लोटला होता. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गा तांबे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांचे नेमके विचार काय होते आणि त्यांचा इतिहास कशा प्रकारे मांडला गेला पाहिजे, हा संदेश देण्यासाठी या सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले होते.
Maharashtra TimesDevendra Fadnavis: फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत, नेमका आरोप काय?
या कार्यक्रमात बोलताना जयश्री थोरात यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने दोन मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा जयश्री थोरात यांनी तीव्र निषेध केला. ‘महाराजांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही,’ असं म्हणत त्यांनी शास्त्रींच्या विधानाचा समाचार घेतला. तसेच आपली आई आणि विठुरायाला सुद्धा आपण आपला विठुराया असेच म्हणतो असं सांगितलं.

महायुतीच्या नेत्यांवर तोफ डागली

राज्यातील महायुती सरकारमधील नेते वारंवार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘एकीकडे शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांना अभय द्यायचे, हा दुटप्पीपणा आता चालणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर तोफ डागली. ‘छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवरायांना अजून 10 वर्षे मिळाली असती तर मराठा साम्राज्य जगात राज्य केलं असतं’, असं म्हणत ‘त्यांचा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठीच आम्ही हे सामूहिक वाचन करत आहोत,’ असं देखील जयश्री थोरात म्हणाल्या.

Maharashtra TimesAshok Kharat Case: खरात प्रकरणात सर्वांत मोठा पुरावा समोर; आता थेट फार्महाउसमधील स्टिंग ऑपरेशन हाती, ‘कूक’ने काळे कारनामे केले उघड
सत्ताधारी नेते व्यासपीठावर असताना धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्यासपीठावरून कुणीही त्यांना रोखलं नाही असे देखील त्यांनी म्हाते आहे.बाळासाहेब थोरात यांच्या कन्या म्हणून जयश्री थोरात आता सक्रिय राजकारणात आणि समाजकारणात आपली पकड घट्ट करताना दिसत आहेत. संगमनेरमधील या मोठ्या शक्तीप्रदर्शनामुळे आणि त्यांच्या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. या सामूहिक वाचनाच्या माध्यमातून काँग्रेसने एकीकडे वैचारिक लढा पुकारला आहे, तर दुसरीकडे महायुतीला शिवरायांच्या मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती आखल्याचे दिसून येते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा