• Fri. Aug 7th, 2026
    MMC Election 2026: अटीतटीची लढत! महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी आज मतदान; नऊ जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात

    Maharashtra Medical Council election 2026: भाजपने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या डॉक्टरांच्या मूळ संघटनेवर दबाव टाकून त्यांना आपल्या बाजूने ओढले,’ असा आरोप आयएमएच्या माजी सदस्यांच्या पॅनेलने केला आहे.

    एमएमसीसाठी आज मतदान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीसाठी आज, रविवारी राज्यात मतदान होणार आहे. नऊ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही लढत अटीतटीची झाली आहे. एक लाख ४० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून परळ येथील हाफकिन प्रशिक्षण संशोधन संस्थेमध्ये बुधवारी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीतील राजकीय हस्तक्षेपावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत.

    मुंबईत जे. जे. रुग्णालय आणि वाकोला येथील मतदान केंद्रांवर शनिवारी मतदानाची तयारी सुरू होती. विविध पॅनलमधील काही डॉक्टरांनी मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर बूथही लावले. मात्र संध्याकाळी उशिरा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी केल्या.

    Maharashtra TimesAAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला
    आयएमएमध्ये फूट पडल्याने या नावाने तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये ‘आयएमए अधिकृत’ या पॅनलमधील उमेदवारांचा भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावर या पॅनलला भाजपकडून अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला. ‘भाजप पॅनल (आयएमए)’ असा प्रचार सुरू आहे.

    ‘होमिओपॅथी, आयुर्वेदिक या पॅथींनाही ‘मिक्सो’पॅथीमध्ये प्रॅक्टिस करता यावी, सरकारचे रुग्णालयांवर नियंत्रण राहावे, छोट्या रुग्णालयांना कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये सामावून घेता यावे, विमा योजनांमध्ये हस्तक्षेप, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियंत्रण अशा विविध कारणांसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत आहे,’ असा आरोप ‘आयएमए’च्या माजी सदस्यांच्या पॅनलने केला आहे. यासंदर्भात ‘आयएमए’च्या अधिकृत पॅनलचे डॉ. संतोष कुलकर्णी यांच्याकडे संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही. ‘हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनल’चे डॉ. तुषार जगताप यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायला हव्यात, त्यात राजकीय हस्तक्षेपाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला.

    Maharashtra TimesRohit Pawar : ‘शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला, अन्यथा…’; आमदार रोहित पवारांची मागणी
    ‘ज्या पॅथीमध्ये प्रॅक्टिस करतो, त्यातील ज्ञानाचा अभिमान हवा. सर्वांनी एकत्रित येऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगले काम करण्याची गरज आहे. दुर्दैवाने हा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे,’ अशी खंत डॉ. ललित आनंदे यांनी व्यक्त केली. ‘ही प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपाशिवाय पारदर्शी पद्धतीने व्हायला हवी. डॉक्टरांनी राजकीय दबाव का सहन करायचा,’ असा प्रश्न ‘आयएमए एमएमसी’ गटाचे डॉ. अनिल पाचणेकर यांनी उपस्थित केला. ‘स्वायत्त एमएमसीमध्ये असा राजकीय हस्तक्षेप हे लोकशाही धोक्यात असल्याचे द्योतक आहे,’ असे मत डॉ. सुहास पिंगळे यांनी व्यक्त केले.

    दरम्यान, राजकीय कार्यकर्ते, तसेच पदाधिकाऱ्यांना राहत्या परिसरातील पाच डॉक्टरांना मतदान केंद्रावर आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
    Maharashtra TimesMarathi Compulsion : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येणं गरजेचं, अन्यथा परवाने रद्द? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
    राजकीय मदत
    प्रचारासाठी काही डॉक्टरांच्या पॅनलनी राजकीय मदत घेतली असून अनेक पक्षांचे पदाधिकारी थेट प्रचारामध्ये उतरले. जे. जे. आणि वाकोला, ठाणे या दोन्ही ठिकाणच्या मतदान केंद्राबाहेर रात्री उशिरापर्यंत या कार्यकत्यांची गस्त सुरू होती. वांद्रे पश्चिम येथे शनिवारी रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून डॉक्टरांसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. पदाधिकारी थेट प्रचारात उतरले आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा