Trimbakeshwar Temple VIP Darshan Scam: प्रत्येक भाविकाकडून पाच हजार, तीन हजार, दोन हजार यानुसार पैसे घेत मोठ्या प्रमाणात भाविकांची आर्थिक लूट करतात, असे त्यांच्यावर आरोप आहेत.
पंचवटीतील ४६ वर्षीय आनंदा सुरेश मेहेंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित गोटीराम मनाजी पेहरे, अभिषेक कडलग, ओम कडलग आणि पुरुषोत्तम मधुकर कडलग या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या चारही संशयितांना शुक्रवारी (दि. २४) न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्या न्यायकक्षात सुनावणी झाली. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी तपासातील मुद्दे स्पष्ट केले. अभियोग कक्षाच्या सहाय्यक संचालक किरण बेंडभर व सहाय्यक अभियोक्ता सायली गोखले यांनी युक्तिवाद केला. कडलगच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल यांनी जोरदार युक्तिवाद केला.
Sinner Farmer: सरकारी कामात अडथळा, सिन्नरच्या तहसीलदारासमोरच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, काय घडलं असं?
दरम्यान, दर्शन रांगेत ताटकळत उभ्या भाविकांसोबत मध्यस्थ संपर्क साधत जलद दर्शनासाठी किंमत निश्चित करतात. त्यानंतर मध्यस्थ हे संशयित पुरुषोत्तम कडलग, अभिषेक कडलग, ओम कडलग यांच्याशी संपर्क साधत भाविकांना त्यांच्यासोबत मंदिरात पाठवतात.
Nashik Crime : अॅक्सिस नासिक ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’वर पीडितांचे फोटो शेअर, नाशिक TCS प्रकरणात 75 मिनिटांचा युक्तिवाद, लॅपटॉप स्क्रीनमागे भयंकर
मुर्तडक टोळीचा म्होरक्या
संशयित मुर्तडक हा टोळीचा प्रमुख मध्यस्थ होता. त्याचे सात साथीदार देशभरातील भाविकांशी संपर्क साधत अवघ्या पंधरा मिनिटांत ‘व्हीआयपी दर्शन’ करून देण्याचे आमिष दाखवायचे. त्यासाठी प्रत्येक भाविकाकडून किमान तीन तर जास्तीत जास्त बारा हजार रुपये उकळले जायचे. धक्कादायक म्हणजे, मुर्तडकमार्फत प्रतिदिवस पंचवीस ते अठ्ठावीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम कडलगपर्यंत पोहोचवली जायची. मुर्तडकच्या बँक खात्यातून कडलगसह इतर संशयितांच्या बँक खात्यात सहाशेपेक्षा जास्त वेळा आर्थिक व्यवहार झाल्याच्या नोंदी न्यायालयात सादर करण्यात आल्या.
