Shivshahi Bus Fire: शुक्रवारी प्रशासनाने एसटीच्या पालघर विभागातंर्गत असलेल्या विभागीय कार्यशाळेचे उपयंत्र अभियंता महादेव शिरसाठ यांना निलंबित केले.
ही बस ‘गरम होऊन पाणी फेकते’ असा शेरा वाहन हस्तांतरित नमुन्यामध्ये असूनही त्या संबधित कोणतेच काम विभागीय कार्यशाळेत करण्यात आले नाही, असा ठेपका ठेवत जबाबदारी पार पाडण्यात कसूर केल्याने या बसला आग लागली. त्यामुळे एसटीचे महाव्यवस्थापक (यंत्र अभियांत्रिकी) प्रमोद जगताप यांनी शुक्रवारी एसटीच्या पालघर विभागातंर्गत असलेल्या विभागीय कार्यशाळेचे उपयंत्र अभियंता महादेव शिरसाठ यांना सेवेतून निलंबित केले.
Dombivli News : सायनला लोकलमध्ये चढले, डब्यातच बेशुद्ध, डोंबिवलीकर ज्येष्ठाकडे प्रवाशांसह रेल्वेचंही दुर्लक्ष, रात्रभर 15 तास ट्रेनमध्येच पडून
सुस्थितीमध्ये एसटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या एसटीच्या यांत्रिक प्रवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. ठाणे विभागातील रिक्तपदांचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. पुरेशा प्रमाणात यांत्रिक कर्मचारी नसल्यास एसटी बसच्या दुरुस्तीवर आणि दररोजच्या बसच्या दुरुस्तीच्या कामावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्वारगेट येथून वसईला निघालेल्या वसई आगाराच्या शिवशाही बसला गुरुवारी दुपारी ठाण्यातील सॅटिस पुलावर भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण बस जळाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत एसटी प्रशासनाचे अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात. बसमधील एसी अल्टरनेटर जाम होऊन शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आग लागलेली शिवशाही बस सहा वर्षे ३ महिने जुनी असून या बसची नोंदणी १० डिसेंबर, २०१९ रोजी झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही बस एसटीच्या ठाण्यातील कळवा येथील विभागीय कार्यशाळेत ठेवण्यात आली आहे. या कार्यशाळेतील अधिकाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त बसचा प्राथमिक तपासणी अहवाल एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाला सादर केला.
Thane Crime: लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय तर सावधान! ठाण्यात रील पाहून मुलाकडून भयंकर कृत्य, लहान बहिणीने गमावला जीव
ठाणे यांत्रिक विभाग कमकुवत
एसटीच्या ठाणे विभागात एकूण आठ आगार आणि एक विभागीय कार्यशाळा आहे. एसटी बसेसची महत्त्वाच्या दुरुस्तीची कामे कार्यशाळेत केली जातात. किरकोळ दुरुस्तीची कामे आगारातील यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून केली जातात. बस सुस्थितीमध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर आगारातून बस प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बाहेर पडते. मात्र, एसटीच्या ठाणे विभागातील यांत्रिक प्रवर्गातील पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.
विभागीय कार्यशाळेतील मंजूर पदे २३८ आहेत. त्यापैकी १५०हून अधिक पदे रिक्त आहेत. ठाणे १, ठाणे २, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा या आगारातील यांत्रिक प्रवर्गातील अनेक पदे भरलेली नाहीत. विभागीय कार्यशाळा आणि आठ आगारातील यांत्रिक कर्मचाऱ्यांची मंजूर ८३६ पदांपैकी ४००हून जास्त पदे रिक्त असून रिक्त पदांचे प्रमाण ४९ टक्के आहे. रिक्त पदामुळे बसची दुरुस्ती वेळेत होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
