• Sat. Jun 6th, 2026
    Bageshwar Baba : ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य

    Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर बाबांनी नागपुरातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते, असं बागेश्वर बाबा म्हणाले. ते एवढंच बोलून थांबले नाहीत तर शिवाजी महाराजांनी मुकूट काढून रामदास स्वामींकडे ठेवले आणि आपण थकलो राजपाट तुम्ही सांभाळा. आपल्याला आता आराम करायची इच्छा असल्याचं शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले, असं धक्कादायक वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र कृष्ण शास्त्री तथा बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. नागपुरात भारतदुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. “भारतीय सनातनी परंपरेत जन्म घेतल्याने आज आणखी गौरव होत आहे. आम्ही धन्य आहोत, ज्या देशात आम्ही जन्म घेतला तिथे मातृ प्रधानता आहे. अशा देशात भारतदुर्गामाता मंदिरचे भूमीपूजन होत आहे”, असं बागेश्वर बाबा म्हणाले. यानंतर त्यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

    “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करता करता खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो आहोत. ते एक दिवस समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपले मुकूट उतारले आणि सांगितलं की, आम्ही खूप युद्ध लढलो. आता कृपा करा की, आम्हाला खूप लढायचं नाही. एक मोठी दया करा, हे मुकूट आपण सांभाळा. हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आता आमच्याकडून पुढे चाललं जात नाही. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही आता खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा आहे. आता आम्ही काही दिवस काही करु इच्छित नाहीत”, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

    “शिवरायांच्या म्हणण्यावर स्मितहास्य करत समर्थ रामदास स्वामी भगवान म्हणाले, ठिक आहे, आम्हाला स्वीकार आहे. पण एक गोष्टी आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही आमचे कोण आहात? ते म्हणाले, आम्ही आपले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत? तर म्हणाले गुरु आहात. मग शिष्यचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामींनी केला. त्यावर जो गुरु आज्ञा देणार त्याचं पालन करण्याचं कर्तव्य शिष्याचं आहे, असं शिवाजी महाराज म्हणाले. समर्थ रामदास स्वामी यांनी मुकूट उठवलं आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालणार. पण आज्ञा तुम्हाला आहे. तुम्हाला संचालन करायचं आहे”, असा धक्कादायक दावा बागेश्वर बाबांनी केला.

    “ही घटना सांगून मला सांगायचं आहे की, देवाच्या आज्ञेने भारतमाताच्या आज्ञेने आपल्या सगळ्यांचा गौरव आहे की, अशा महापुरुषाने या भूमीवर जन्म घेतला, वर्तमानात ते संघाचे प्रमुख आहेत. पण त्यांनी भारताच्या गौरवाला विश्वपटलावर विस्थापित करण्यासाठी आपलं जीवन दिलं, तन, मन, आयुष्य दिलं. आम्हाला विश्वास आहे की, ज्यादिवशी भारतमाता दुर्गामंदिर बनेल त्यादिवशी भारत शक्ती संपन्न होईल आणि अखंड भारत होईल”, असं बागेश्वर बाबा तथा धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा