• Sat. Jun 6th, 2026
    Bageshwar Baba : ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS ला द्या’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य

    बागेश्वर बाबांनी नागपुरात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं. संघाच्या कामांचं कौतुक करत असतानाच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS द्या’, असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर येथे भारतदुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं. संघाचं कौतुक करत असताना बागेश्वर बाबांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS द्या’, असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं आहे. याचवेळी भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दरम्यान, त्यांनी नागपुरात निर्माण होत असलेल्या भारतमाता दुर्गामाता मंदिराबाबत आनंद व्यक्त केला.

    “आपल्या मनात जो संकल्प आला, भारतमाता दुर्गामाताच्या मंदिराचा संकल्प आहे. आम्ही मागे बसलो होतो तेव्हा एकजण सांगत होतं की, आपल्या मनात कल्पना आली की, लोकांना वाटत असेल की कल्पना आली. पण माझ्या मते भारतमातानेच हे निवडलं असेल की, असं व्हावं. आमचे गौरव पुन्हा स्थापन व्हावं आणि त्याचे निमित्त आपण व्हावं”, असं बागेश्वर बाबा सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून म्हणाले.

    “आम्हाला वाटतं की, इथल्या देवशक्तीने हा विचार केला आहे. इथल्या कणाकणाने हा विचार केला आहे. संपूर्ण जगात आपल्या भारतातच भारत माता की जय म्हटलं जातं. आपला देश एकमेव असा आहे जिथे भारत माता की जय म्हटलं जातं. पूर्ण जगतात स्त्रियांना उपभोगण्याची वस्तू मानले जाते पण आमच्या भारत देशात मातांना पुज्य मानले जाते. असा आहे आमचा भारत. या भारताच्या गौरवाला पुन्हा विस्थापित करण्यासाठी संघचालक मोहन भागवतजी आपण जो संकल्प केला, आपला भारत आता नवा इतिहास रचणार आहे”, असं ते म्हणाले.
    Maharashtra TimesBageshwar Baba : ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
    “आमचा भारत पुन्हा देवशक्तीकडे जात आहेत. जेव्हा भारताचे लोक नागपुरात कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या प्रांगणात दुर्गामाता मंदिरचे दर्शन घेतील, ज्यांच्या बुजांमध्ये अस्त्र-शस्त्र आहे. तेव्हा भारताचे लोक जाणतील की, भारत शास्त्र आणि शस्त्रने चालतो. आमच्या भाषेत माला आणि भाला म्हणतात. आमच्या देवी-देवतांच्या हातात अस्त्र आणि शस्त्रदेखील आहे. त्यामुळे बनसी वाजवल्याने काम चाललं असतं तर महाभारत का झालं असतं? भारतमाता दुर्गामाताच्या या मंदिर निर्माणाच्या संकल्पनेचे आम्ही खूप आनंदी आहोत. आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. आपण निरोगी राहवं, यापेक्षा मोठे संकल्प आपल्या हातून पूर्ण होवोत. भारत भगवामय आणि सनातनमय राहावा. आपल्यादेखल अखंड भारताच्या दिशेला आपण जावो, अशी प्रार्थना करतो”, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

    “सर्व संतजणांना पुन्हा प्रमाण करतो. जेव्हा मोठे बसलेले असतात तेव्हा कमी बोलायला हवं. मोठमोठे सूर्य बसले आहेत. आम्ही तर छोटे-मोठे दीपक आहोत. जास्त बोललो तर पुढच्यावेळी पत्ता साफ होईल. जास्त बोलतो तर त्याला साईडला करा. हा कामाचा नाही. त्यामुळे वडिलधाऱ्यांसोबत कमी बोलावं”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    बागेश्वर बाबांचं भारताला आवाहन

    “मी भारताला एक गोष्ट सांगू इच्छितो, जेव्हा संपूर्ण भारतात कुठेही संकट आलं तर लोक जीव वाचवण्यासाठी पळतात. पण आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक-एक कार्यकर्ता जीव वाचवून पळत नाही तर तिथे जावून अनेकांचे प्राण वाचवतो. हा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मी पूर्ण भारताला प्रार्थना करतो, मुलं चार जन्माला घाला, पण एक स्वयंसेवक संघाला द्या, जेणेकरुन दुसऱ्याला वाचवायला कामी येईल”, असं वक्तव्य बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा