IMD Weather Forecast: कोकण विभागात गुरुवारी इतर केंद्रांवरही पारा चढा होता. वारा खंडितता प्रणालीमुळे कमाल तापमान वाढल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
weather alert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सकाळी घरातून बाहेर पडतानाच मुंबईकरांना जाणवलेल्या उष्ण वातावरणाने गुरुवारी संध्याकाळपर्यंत वातावरणातील उष्मा कायम ठेवला होता. वाऱ्याची झुळूकही जाणवत नसल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षाही अधिक उष्णता जाणवत असल्याचे निरीक्षण मुंबईकरांनी नोंदवले. मुंबईमध्ये गुरुवारी सांताक्रूझ येथे ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक जाणवल्याचेही मुंबईकरांनी सांगितले. मुंबईत ही स्थिती शनिवारपर्यंत कायम राहू शकते.
सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा गुरुवारी २.३ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक नोंदला गेला. शुक्रवारी कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत जाऊ शकते, असाही अंदाज आहे. तसेच दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह मुंबईत पाऊसही पडू शकतो, अशीही शक्यता आहे. शनिवारी २५ एप्रिलला कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस असू शकेल आणि त्यानंतर रविवारी पारा किंचित खाली घसरून ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले जाऊ शकेल. कुलाबा येथे गुरुवारी ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. रत्नागिरी येथे ३६, तर डहाणू येथे ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
उर्वरित महाराष्ट्रात पुणे, लोहगाव, जळगाव, मालेगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड तसेच विदर्भातील सर्वच केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा ४० अंशांहून पुढे आहे. विदर्भातील सर्व केंद्रांवर कमाल तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक आहे. अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान गुरुवारी नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी अधिक होते. पुणे, लोहगाव येथील केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा हा सरासरीपेक्षा अनुक्रमे दोन आणि २.८ अंशांनी अधिक होता.
दरम्यान, पुणे, पुण्याचा घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याच वेळी या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा चढा होता. कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत कमाल तापमानाचा पारा चढा असेल, असा अंदाज आहे. तर सिंधुदुर्गात मात्र शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा