Sindhudurg Shaktipeeth Expressway Route: राज्यातील 13 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गातील आराखड्यात बदल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील महामार्गांमध्ये एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाची भर पडणार आहे. राज्य सरकारकडून नागपूर ते गोव्यापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचा आराखडा बदलला असून सातारा जिल्ह्याचा समावेश केला आहे. मूळतः 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा मार्ग आता 13 जिल्ह्यांमधून जाणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. हा महामार्ग सुमारे 856 किमी लांब असणार असून, राज्यातील शक्तीपीठांना जोडणार आहे.
कोणत्या शक्तीपीठांना जोडणार?
या महामार्गाचा नवीन सुधारित आराखडा सादर करण्यात आला आहे. आता शक्तीपीठ महामार्गाला शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवीपर्यंत हा संपूर्ण महामार्ग असणार आहे. त्यात या मार्गाला आता राज्य महामार्ग क्रमांक 10 चा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महालक्ष्मी, तुळजा भवानी आणि रेणुका माता अशा तीन महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणार आहे. यासह इतर तीर्थक्षेत्रांना हा मार्ग जोडणार आहे.Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल
कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील 14 गावांमधून शक्तीपीठ मार्ग जाणार आहे. या सर्व गावांची यादी समोर आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचाही समावेश आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून ही हा मार्ग जाणार आहे. कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्याच्या सीमेवर हा मार्ग समाप्त होईल.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गावांची यादी समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इसापूर येथून हा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात कुंभवडे, फुकेरी, झोळंबे या 3 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाईल. नंतर सावंतवाडी तालुक्यातील केगड, उडेली, नेने, फणसवडे, घाराप, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव, पडवे, डेगवे आणि बांदा अशा इतर 11 गावांमधून हा महामार्ग जाईल. या नव्या आराखड्यात गेळे, आंबोली, वेर्ले, तळकट आणि कोलझर हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या गावांना वगळण्यात आले आहे.
Navi Mumbai News: अटल सेतू ते मुंबई-पुणे महामार्ग ‘सिग्नल फ्री’ प्रवास! नव्या उन्नत कनेक्टरमुळे टेन्शन मिटणार; मार्गाची डेडलाइन समोर
सध्या नागपूर ते गोवा प्रवासात 18 ते 21 तास वेळ जातो. हा मार्ग पूर्ण होताच, प्रवासाचा वेळ अवघ्या 8 ते 9 तासांवर येणार आहे. तसेच, हा मार्गाला राज्यातील प्रमुख महामार्गांशी जोडण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भासारख्या जिल्ह्यांना कोकणातील महत्त्वाच्या बंदरांशी जोडण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा