• Tue. Jun 16th, 2026

    Pune Accident: कात्रज घाटात भीषण अपघात; एसटी-रिक्षाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; चालकाचा जागीच मृत्यू

    Pune Accident: कात्रज घाटात भीषण अपघात; एसटी-रिक्षाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; चालकाचा जागीच मृत्यू

    Katraj Ghat Accident: सांगलीला निघालेल्या एसटी बसने कात्रज घाटात रिक्षाला धडक दिल्यामुळे एक भीषण दुर्घटना घडली आहे. यावेळी रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल 2026) सायंकाळी सुमारे 5:25 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर एसटी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

    स्वारगेटहून सांगलीला जाताना अपघात

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 10 डीटी 2697 क्रमांकाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस स्वारगेटहून सांगली जिल्ह्यातील विटा दिशेने जात होती. त्याचवेळी एमएच 12 जीएस 9695 क्रमांकाची रिक्षा खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने येत होती. घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.Maharashtra TimesNanded Accident : वाढदिवसावरुन परतताना काळाची झडप, माय-लेकासह तिघांचा मृत्यू; भीषण अपघातात दूरवर फेकले गेले

    या अपघातात रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागर नगर, बिबेवाडी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच रिक्षातील अन्य प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. राजेश इंगवले (वय 48, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड), दशरथ निरगुडे (वय 43, रा. अप्पर बिबेवाडी), शहाजी लक्ष्मण शिवदे (वय 41, रा. अप्पर इंदिरानगर, बिबेवाडी) अशी जखमीची नावे आहेत.

    जखमींवर उपचार सुरू

    जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेतले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली.

    Maharashtra TimesPune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल

    दरम्यान, एसटी बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, रा. शेडगेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कात्रज घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा