• Sun. Jun 7th, 2026

    ऐन उन्हाळ्यात मुंबईत पाणीकपात! बुधवारी 18 तास पुरवठा बंद; दादर, भायखळा, परळसह अनेक भागांना फटका

    ऐन उन्हाळ्यात मुंबईत पाणीकपात! बुधवारी 18 तास पुरवठा बंद; दादर, भायखळा, परळसह अनेक भागांना फटका

    Mumbai Water Supply Cut: दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये बुधवारी सकाळपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

    मुंबई: ऐन उन्हाळ्यात अनेक शहरांवर पाणी कपातीचं संकट निर्माण झालं आहे. आता मुंबईतसुद्धा पाणीकपात होणार आहे. शिवडीमध्ये अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या आठवड्यात काही भागांत पाणीपुरवठा खंडित होणार आहे. मुंबईतील दक्षिण आणि मध्य परिसराती पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील काही भागांत बुधवारी, 22 एप्रिल रोजी, 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

    कशामुळे पाणीपुरवठा बंद?

    शिवडीमध्ये हाजी बंदर मार्गावर 1,500 मिमी व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. भंडारवाडा जलशयाला जोडलेल्या बोगद्याला जोडलेल्या पाईपलाइनला हे व्हॉल्व जोडण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता हे काम सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत काम सुरू असेल. त्यामुळे या 18 तासांदरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे.Maharashtra TimesPune Water Cut: पुणेकरांनो, पाणी भरुन ठेवा! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही काम देखभालीसाठी हाती घेतली नसून भंडारवाडा, फॉसबेरी आणि गोलांझी टेकड्यांसह महत्त्वाच्या जलाशयांमधून पाण्याचे वितरण सुरळीत करण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईला पाणीपुरवठा करण्यात हे जलाशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मुंबईसारख्या शहरात जुन्या पाईपलाइन आणि अनेक कारणांमुळे अनेक वेळा तक्रारी येतात. त्यामुळे हे काम करणे गरजेचं आहे.

    कोणत्या भागांवर परिणाम?

    तथापि, त्वरित परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवेल. ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण प्रभागांमधील संपूर्ण भाग पूर्णपणे बंद असेल, तर इतर अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी असेल. सीएसएमटी, भायखळा, नागपाडा, लालबाग, परळ, शिवडी, वडाळा आणि दादरच्या काही भागांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मोहम्मद अली रोड, मशीद बंदर आणि आग्रीपाडा सारख्या दाट वस्तीत काही तासांच्या व्यत्ययामुळे दैनंदिन दिनचर्येत ताण येऊ शकतो, विशेषत: मर्यादित साठवण क्षमता असलेल्या जुन्या इमारतींमध्ये.

    Maharashtra TimesThane Water Cut : ठाण्यात वॉटर शटडाऊन! मुंब्रा, कळवा, दिव्यात पाणीपुरवठा खंडीत राहणार, ‘या’ भागांना सर्वाधिक फटका

    रुग्णालयांनाही फटका

    दरम्यान, रुग्णालयांमध्ये ही या कपातीचं परिणाम होणार आहे. शटडाउन विंडो दरम्यान पाण्याचा दबाव कमी होईल. यामध्ये केईएम, टाटा, जेजे, नायर आणि कस्तुरबा रुग्णालयांसारख्या प्रमुख सार्वजनिक आरोग्य संस्थांचा समावेश आहे. बीएमसीने कमी दाब असला तरी पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. रुग्णालय प्रशासनाने बॅकअप स्टोरेज आणि आकस्मिक प्रणाली कार्यान्वित करणे अपेक्षित आहे. नागरी अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पुरेसे पाणी साठवण्याचे आणि व्यत्यय दरम्यान ते कमी प्रमाणात वापरण्याचे आवाहन केले आहे. पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळणे आणि फिल्टर करणे देखील सावधगिरीचा सल्ला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा