Nashik Lift Collapsed: जेलरोड येथे तिसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून चौघे जखमी झाले आहेत. यातील मायलेकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
राहुलनगरमधील पारा अॅव्हेन्यू सोसायटीमध्ये झालेल्या या दुर्घटनेत गौरी अभिजित मकवान (वय २४), हर्षित अभिजित मकवान (४ वर्षे), वैभवी मंगेश मकवान (१०) आणि मनस्वी मंगेश मकवान (४) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गौरी मकवान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दोन महिन्यांपासून लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत होता. याबाबत बिल्डर, तसेच संबंधित लिफ्ट कंपनीकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
Sudhakar Badgujar: नाशिक महापालिकेच्या करवसुलीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; सुधाकर बडगुजरांचा गंभीर आरोप
रविवारी (दि. १९) गौरी मकवान यांची मुलगी तुळजा हिच्या बारशासाठी मकवान यांच्या घरी नातेवाईक आले होते. गौरी या रात्री साडेदहाच्या सुमारास मुलगा हर्षित आणि पुतण्या वैभवी, मनस्वी यांच्यासह तळमजल्यावर होत्या. हे सर्व जण लिफ्टमधून चौथ्या मजल्यावरील घरात जाण्यास निघाले असता तिसऱ्या मजल्यावर मोठा आवाज होऊन लिफ्ट वेगाने तळमजल्यावर कोसळली. त्यात हे चौघे जखमी झाले. दरम्यान, सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डर किसन पोकार व लिफ्ट कंपनीविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Nashik Crime : नवरा शहराबाहेर, मी तुझ्या गरजा पूर्ण करतो; नाशिक TCS मधील पीडितेचा छळ; मी तुझ्या पतीपेक्षा देखणा, दोघात काही घडलं तर…
मायलेकाचे पाय फॅक्चर
लिफ्ट कोसळल्यानंतर इमारतीतील रहिवासी सुनंदा घुगे, जगदीश जमदाडे व इतरांनी चौघांना बाहेर काढले. मकवान कुटुंबीयांनी चौघांनाही त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत गौरी यांच्या दोन्ही टाचा, तसेच त्यांचा मुलगा हर्षित याचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे. पुतणी मनस्वीच्या छातीला व पायाला, तर वैभवीच्या कमरेला मार लागला आहे.
