• Thu. Jun 18th, 2026

    Crime News: महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; आधी वाघाने हल्ला केल्याची चर्चा, पण आता वेगळाच संशय, घटनास्थळी काय-काय आढळलं?

    Crime News: महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; आधी वाघाने हल्ला केल्याची चर्चा, पण आता वेगळाच संशय, घटनास्थळी काय-काय आढळलं?

    Woman Murder Case: महिलेचा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाला की ही पूर्वनियोजित हत्या होती, हे पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

    वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची चर्चा, पण आता मोठा ट्विस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रतीक तांबोळी, भंडारा: मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सदर महिलेच्या मृत्यू प्रकरणात आता संशयाचे सावट निर्माण झालं आहे. सुरुवातीला तिचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला असावा असे मानले जात होते, परंतु घटनास्थळावरील परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवालाने गंभीर प्रश्न निर्माण केले असून, या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. वाघाच्या हल्ल्याचा बनाव रचून त्या महिलेची पूर्वनियोजितपणे हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

    ही घटना उघडकीस येताच धानेगाव आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 17 एप्रिल रोजी तुमसर तालुक्यातील धानेगाव मधील तुमसर वनक्षेत्रात साधना सीताराम उइके नावाची ५२ वर्षीय महिला मृत अवस्थेत आढळली होती. महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आला. प्राथमिक तपासात हा वन्य प्राण्याचा हल्ला असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु आता अनेक विसंगती समोर आल्या असून यातून हत्येचा संशय बळावला आहे.वन विभागाने सुरुवातीला वन्य प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारली होती.

    तज्ञांच्या मते, जर हा वाघ किंवा बिबट्याचा हल्ला असता, तर मृताच्या मानेच्या दोन्ही बाजूंना खोल जखमा आढळून आल्या असत्या. परंतु, या प्रकरणात महिलेच्या मानेच्या फक्त एकाच बाजूला सुमारे २ इंच लांबीची एक धारदार जखम आढळून आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रक्ताचे डाग असलेल्या ठिकाणापासून सुमारे २.८ किलोमीटर अंतरावर महिलेचा मृतदेह सापडला आहे. वन्य प्राणी सहसा आपली शिकार ओढत नेतात, परंतु घटनास्थळावरील जमीन नेहमीपेक्षा खूपच सपाट होती, ज्यामुळे मृतदेह पोत्यात घालून आणला असावा असा संशय निर्माण होत आहे. शिवाय, मृतदेह १५ फूट खोल खड्ड्यात सापडला, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.

    दरम्यान, मृतदेहाच्या खांद्यापासून कमरेपर्यंत खरचटल्याच्या खुणा आढळल्या, परंतु पायांवर किंवा टाचांवर कोणतीही जखम नव्हती, ज्यामुळे ही संपूर्ण घटना अधिकच संशयास्पद झाली असून हा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाला की पूर्वनियोजित हत्या होती, याबाबतचा तपास पोलीस प्रशासन आणि वनविभागाकडून केली जात असून या तपासातून नेमकं काय निष्पण्ण होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा