• Sun. Jun 14th, 2026
    Devendra Fadnavis: विरोधकांचा खरा चेहरा उघडा पडला! महिला आरक्षण मुद्द्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

    Devendra Fadnavis On Women Reservation: महिला आरक्षणाबरोबरच मतदारसंघ पुनर्रचना, जातनिहाय गणना आणि महायुतीच्या पुढील आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाष्य केले.

    देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : भाषणापुरता महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा वापर करणाऱ्यांचे खरे चेहरे आता उघडे पडले आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.

    ‘२०२३मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक संमत झाले, तेव्हा जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना पूर्ण करून हे विधेयक लागू करण्याबाबात सुधारणा झाली होती. त्यामुळे आता आलेले विधेयक हे अचानक आलेले नाही. कोविडमुळे जनगणना लांबली. मागचा अनुभव लक्षात घेता जनगणना, मतदारसंघ पुर्नरचना यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता महिला आरक्षण लागू करणे लांबणीवर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे संसदेने २०२३ ला घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ फेररचना करून कोणत्याही स्थितीत २०२९ ला महिला आरक्षण विधेयक लागू करावे आणि २०२९ ला सर्वाधिक संख्येने संसदेत महिला निवडून येतील, अशा शुद्ध भावनेने याची होती.

    Fadnavis VS Sule | महिला विधेयकावरून फडणवीसांचं ओपन चॅलेंज सुळेंनी स्विकारलं, नेमकं काय घडलं?

    एनडीएजवळ दोनतृतीयांश बहुमत असते तर एकमताने हे विधेयक मंजूर झाले असते. कोणी विरोध केला नसता. संख्याबळ नसल्याचे लक्षात आल्याने विरोधकांना ही संधी दिसली पण चुकीच्या ठिकाणी संधी शोधली’, असे ते म्हणाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अदिती तटकरे, खासदार ज्योती वाघमारे, महापौर रितू तावडे आदी उपस्थित होते.‘राहुल गांधी खोटारडेपणात विजेते’
    ‘एखादी व्यक्ती किती खोटे बोलू शकते, याच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्या तर त्याचे सुवर्णपदक काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मिळेल. हे विधेयक घटनेने दिलेल्या संकेतांनुसारच होते. राहुल यांनी विरोध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रतारणा केली. त्यांनी दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे’, असेही त्यांनी नमूद केले. ‘काँग्रेसची मानसिकता अर्बन नक्षल झाली आहे. सातत्याने त्यांनी महिला विरोधी धोरणे घेतली. शाहबानो प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घटना संशोधन करून बदलणारा हा काँग्रेस पक्ष आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

    Maharashtra TimesMumbai Drugs Seized: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! टिटवाळ्यात तब्बल 6 कोटींचे ड्रग्ज जप्त; महिला सप्लायर अटकेत
    ‘प्रियांका गांधींचा दोष नाही’
    ‘काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या नव्या आहेत. त्यांचा पुरेसा अभ्यास नसेल. २०२३ला मंजूर केलेल्या विधेयकामुळे मतदारसंघ फेररचना आणि जनणगणनेशिवाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, हे कदाचित त्यांना त्यांच्या लोकांनी सांगितले नसेल’, म्हणून त्यांनी असा आरोप केला. मी त्यांना दोष देत नाही, असेही ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा