• Tue. Aug 18th, 2026

सावरकर मानहानी प्रकरण; हस्तक्षेप अर्ज फेटाळला, फडणीस यांना 20 हजारांचा दंड, पुणे न्यायालयाचा निर्णय

सावरकरांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात जनहित याचिका केल्या आहेत, असा दावा फडणीस यांनी केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात हस्तक्षेपासाठी प्रा. डॉ. पंकज फडणीस यांनी केलेला अर्ज पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळला.

फडणीस हे सावरकरांचे कुटुंबीय किंवा निकटवर्तीय नातेवाईक नसल्याने त्यांना या खटल्यात हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesPune Crime : ‘तू पोरींना काय बोलला’? ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये तरुणाला मारहाण, प्रकरणाचं सातारा कनेक्शन; पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटकन्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालविल्याबद्दल डॉ. फडणीस यांना २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, पुढील सुनावणीपूर्वी ही रक्कम पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अभ्यासक डॉ. पंकज फडणीस यांनी या प्रकरणात पक्षकार म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर २५ वर्षे संशोधन केले असून, तीन पुस्तके लिहिली आहेत.

Maharashtra TimesPune Crime : सिंहगडावर विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श, पुण्यात पर्यटकांचा दावा, तुफान गर्दीच्या बहाण्याने असभ्य वर्तनमात्र, तक्रारदार सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर आणि राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार या दोन्ही बाजूंनी अर्जाला विरोध केला. ‘ही वैयक्तिक मानहानीची तक्रार असून, तिसऱ्या व्यक्तीला यात हस्तक्षेप किंवा मध्यस्थी करण्याचा अधिकार नाही. अशा मध्यस्थीमुळे खटल्याची सुनावणी मूळ विषयापासून भरकटून विलंब होईल,’ असा युक्तिवाद सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी केला; तर या खटल्यात अर्जदाराला मध्यस्थी करण्याचा कायदेशीर अधिकार नसून, निष्पक्ष सुनावणीच्या हक्काला बाधा पोहोचेल, असा दावा राहुल गांधींच्या वकिलांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरताना भारतीय दंड संहितेच्या कलम४९९ मधील मृत व्यक्तीच्या मानहानीविषयीच्या तरतुदींचाही उल्लेख केला.

मृत व्यक्तीबाबत कथित बदनामी झाल्यास त्याचे कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक यांनाच संबंधित भावना दुखावल्याचा कायदेशीर दावा करता येतो, असे न्यायालयाने नमूद केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा