सोमवारी (दि. १७) माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केले. अमित शहा माफी मागा म्हणतात , हेच इडियटपणाचे लक्षण आहे. संसदेतून पळून गेले, ते इडियट नाहीत का? देशात रोज पेपर फुटत आहेत. मंत्री इकडे-तिकडे फिरत आहेत. मग कुणाला इडियट म्हणायचे?, असा सवाल राऊत यांनी केला.
‘इडियट’ हा असंसदीय शब्द नसल्याचे स्पष्ट करत राऊत यांनी आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाचा दाखला दिला. या देशात ‘थ्री इडियट्स’ नावाचा चित्रपट आला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्वतः पंतप्रधानांनीही हा चित्रपट पाहण्यास सांगितले होते. त्यामुळे भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’ कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Nashik Crime : नुकताच जामिनावर बाहेर आला, टपरीजवळ उभा असताना जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंड सुमित पगारेला दिवसाढवळ्या संपवलंराऊतांच्या जीभेला हाड नाही : पालकमंत्री गिरीश महाजन
संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही , त्यामुळे ते जे काही बोलतात ते बोलू द्या, त्याने काहीही फरक पडत नाही, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी राऊतांच्या आरोपांवर दिले. पंतप्रधान, न्यायालय, निवडणूक आयोग कुणालाही हे सोडत नाहीत. त्यांच्याकडे आज फक्त दोन खासदार उरले आहेत. ते कोणाविरोधात काय बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . पुढील काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचा दाखला देत महाजन यांनी राऊत यांना थेट आव्हान दिले. ठाकरे गटाचा एक तरी जिल्हा परिषद अध्यक्ष करून दाखवा . कारण नसताना बडबड करण्यात अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या खड्ड्यांवरून संजय राऊत आक्रमक; भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार
‘शरद पवार आघाडीसोबतच’
मोदी, शहा आणि फडणवीसांवर हल्लाबोल करताना राऊतांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा बाजू घेतली. पवाराच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही राऊत यांनी पूर्णविराम देत, शरद पवार कुठेही जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील. शरद पवार हे इंडिया ब्लॉक आणि आघाडीचे नेते असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपकडून त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. ‘आपण जोमाने लढू आणि जिंकू’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
