Sanjay Raut : देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, महाराष्ट्रात एक, दोन केंद्रात; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’ असून एक महाराष्ट्रात, तर दोन केंद्रात आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. सोमवारी (दि. १७) माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केले. अमित शहा माफी मागा म्हणतात , हेच इडियटपणाचे लक्षण आहे. संसदेतून पळून गेले, ते इडियट नाहीत का? देशात रोज पेपर फुटत आहेत. मंत्री इकडे-तिकडे फिरत आहेत. मग कुणाला इडियट म्हणायचे?, असा सवाल राऊत यांनी केला.