• Sat. Jun 6th, 2026
    बच्चू कडूंना शिवसेनेची ‘ऑफर’? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विधान परिषदेच्या उमेवारीवर चर्चा

    Bachchu Kadu MLC Offer: अमरावती विभागात सध्या शिवसेनेकडे जनआंदोलने उभी करणारा प्रभावी नेता नाही. ही उणीव बच्चू कडू यांच्या माध्यमातून भरून काढण्याची तयारी शिंदे यांनी केली आहे.

    शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना ‘ऑफर’ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय हालचालींमुळे मुंबईसह थेट अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या १२ मे रोजी ही विधान परिषदेची निवडणूक होत आहे.

    अचलपूर मतदारसंघातून चार वेळा कडू हे आमदार म्हणून निवडून आले. शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवरून त्यांची आंदोलने राज्यभरात गाजली. नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी व्हावी म्हणून अलीकडेच त्यांनी मेळघाटात ११ दिवस शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती. या प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांनी कडू यांच्याशी संवाद साधला.

    Maharashtra TimesAmravati Crime : प्लेबॉय अयान अहमदची ‘क्रेझ’ कायम, इन्स्टा फॉलोअर्स धपाधप वाढले; तीन मोबाइलमधील डेटा रिकव्हर
    कर्जमाफीचे संपूर्ण श्रेयही त्यांनी जाहीररित्या कडू यांना दिले होते. आता थेट पक्षाकडून विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून ‘प्रहार’चा आवाज थेट मुंबईच्या पटलावर पोहोचणार की कडू पुन्हा एकदा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आपला स्वतंत्र बाणा दाखवणार, याकडे अमरावती जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

    Maharashtra TimesAmravati Crime : हाय हॅलो करत बसायचं नाही, एकच प्रश्न थेट विचारायचा; अयानला ‘लव्ह गुरु’च्या टिप्स, 500 रुपयात ‘रुम’ देणाराही सापडला
    ‘प्रहार’ची भूमिका ठरणार निर्णायक
    मुंबईत झालेल्या सुमारे अर्धा तासाच्या बैठकीत कडू आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, बच्चू कडू यांनी अतिशय सावध पवित्रा घेत, आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे समजते. यासंदर्भात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

    Maharashtra TimesIPS Tushar Doshi : सातारा जिल्हा परिषदेतील राडा भोवला, SP तुषार दोषींची 11 महिन्यांत उचलबांगडी, राज्यातील 9 IPS अधिकाऱ्यांची बदली
    आडवे आले, तर सोडणार नाही : शिंदे
    ‘सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेले राजकारण हीन पातळीचे असून, या यशवंत भूमीला ते कधीही मान्य होणार नाही,’ असा घणाघाती इशारा शिवसेनेचे प्रमुख , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. ‘मी स्वभावाने रोखठोक आहे, हिशेब चोख ठेवतो. आडवे आले तर सोडत नाही,’ असा थेट इशारा त्यांनी दिला . गांधी मैदानावर आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख शरद कणसे, हरिभाऊ जगदाळे, जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले आदी उपस्थित होते. या वेळी भाजपमधील उदयनराजे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा