Pune Man Kills Cousin Brother: पुण्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका तरूणाला त्याच्या आत्येभावानेच संपवलं असल्याची घटना घडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे: पुण्यातील बिबवेवाडी-कोंढवा रोड परिसरात एका किरकोळ वादातून थेट खुनापर्यंत गेलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आत्येभावानेच मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून निर्दयीपणे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भावाकडूनच क्रूरपणे हत्या
मृत तरुणाचे नाव रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय 28, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे असून, तो सोशल मीडियावर रील बनवण्याचे काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा आत्येभाऊ कौशल लांडगे (वय 20, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक केली आहे. तसेच त्याचा साथीदार अंश पटेल (वय 18) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pune Crime: प्रियकरासाठी घर सोडलं, लग्न केलं, पण नंतर वेगळाच अनुभव; पुण्यात ३७ वर्षीय इंजिनिअर तरुणीचं टोकाचं पाऊल!
ही घटना सोमवारी (20 एप्रिल) पहाटे सुमारे पावणेपाचच्या सुमारास अश्विनी पॅराडाईज सोसायटीजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि कौशल यांच्यात आधीपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. त्या वादाचं रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झालं. कौशल च्या म्हणन्यानुसार रोहन हा काही काम करत न्हवता फक्त यू ट्यूब वर रील बनवत बसायचा. अशा किरकोळ कारणावरून त्याची हत्या करण्यात आली.
रसत्याने जाताना अडवून हल्ला
घटनेच्या वेळी रोहन रस्त्याने जात असताना कौशल आणि त्याच्या मित्राने त्याला अडवलं. सुरुवातीला त्याच्याशी शिवीगाळ करत लाकडी पट्टीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर संतापाच्या भरात त्यांनी रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून रोहनच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात रोहन गंभीर जखमी झाला.
Pune Crime : आत्याकडे लहानाची मोठी, तिच्याच मुलाशी लग्न; पुण्यात 21 वर्षीय विवाहितेने जीव दिला, कदम मायलेकावर गुन्हा
जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र मार्केटयार्ड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी कौशल लांडगे याला अटक केली. या प्रकरणी रोहनच्या बहिणीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किरकोळ वादातून एवढा टोकाचा निर्णय घेतल्याने नात्यांमधील वाढती दुरावा आणि संताप किती घातक ठरू शकतो, याचे हे आणखी एक धक्कादायक उदाहरण ठरत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा