• Sun. Jun 14th, 2026

    Third Mumbai: तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला गती, विमानतळ, अटल सेतूजवळ नवं शहर; 124 गावांमध्ये कसा असेल प्रकल्प?

    Third Mumbai: तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाला गती, विमानतळ, अटल सेतूजवळ नवं शहर; 124 गावांमध्ये कसा असेल प्रकल्प?

    MMRDA Third Mumbai: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उरण, पनवेल आणि पेन तालुक्यांतील 124 गावांमधील शेतकऱ्यांना तिसऱ्या मुंबई प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनी देण्याकरिता संमती सादर करण्यास सांगितले आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई 3.0’ अर्थात तिसरी मुंबई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रोथ सेंटरसाठी तब्बल 216 एकर जमीन संमतीने संपादित केली. सहभागात्मक भूसंपादन धोरण जाहीर होताच पहिल्याच दिवशी भूधारकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रायगड-पेण विकास केंद्रासाठी मोठ्या प्रमाणावर भूधारकांनी संमती दर्शवल्याने ‘मुंबई 3.0’ला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

    प्रक्रियेतील भागीदार बनवणार

    एमएमआरडीएच्या लोककेंद्रित धोरणामुळे ‘स्थलांतर नव्हे, तर संमतीतून विकास’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. भूधारकांना केवळ मोबदला देण्याऐवजी विकास प्रक्रियेतील भागीदार बनवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणात भूसंपादन शक्य झाले. रायगड ग्रोथ सेंटर हे अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विरार-अलिबाग मल्टी-मॉडेल कॉरिडोर यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या जवळ असल्याने या भागाचे धोरणात्मक महत्त्व वाढले आहे.Maharashtra TimesMumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास सुस्साट होणार; ‘मिसिंग लिंक’ सुरू करण्याचा मुहूर्त ठरला, प्रवाशांसाठी कधीपासून खुला होणार मार्ग?

    ग्रोथ सेंटर प्रकल्पातून दोन लाखांहून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून, मोठ्या प्रमाणावर परकीय व खासगी गुंतवणूक आकर्षित होणार आहे. याचबरोबर प्रादेशिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. भूधारकांसाठी एमएमआरडीएने विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. परस्पर संमतीने भूसंपादन, एफएसआय/टीडीआरच्या स्वरूपात मोबदला, तसेच लँड पूलिंगद्वारे 22.5 टक्के विकसित भूखंड परत देण्याची योजना राबवण्यात येत आहे.

    संमतीपत्रे 27 एप्रिल 2026६पासून एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहेत. अर्ज करताना आधार कार्ड, सात-बारा उतारा आणि 8अ उतारा सादर करणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी http://www.mmrda. maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा.

    ग्रोथ सेंटरमध्ये यांचा समावेश

    • तंत्रज्ञान व वित्तीय सेवा जिल्हा
    • ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) हब
    • डेटा सेंटर जिल्हा
    • मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स
    • आयटी/आयटीईएस/बीपीओ/ केपीओ क्षेत्र
    • आरोग्य व ज्ञान परिसंस्था
    • लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग व वितरण केंद्रे
    • सामाजिक पायाभूत सुविधा व आवश्यक शहरी सुविधा

    कसा-कुठे असेल प्रकल्प?

    एमएमआरडीएने उरण, पनवेल आणि पेनमधील तब्बल 124 गावांतील शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनिची मागणी केली आहे. त्यातच पेन तालुक्यात रायगड-पेन ग्रोथ सेंटरची स्थापना केली जाणार आहे. पनवेलपासून अवघ्या 25 किमी अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून नवी मुंबई विमानतळापासून केवळ 30 किमी अंतरावर असेल. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली! चार प्रवासी अडकल्याने खळबळ; सकाळच्या गर्दीत प्रवाशांचा खोळंबा

    ही तिसरी मुंबई जेएनपीटी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि नवीन उभारण्यात येणाऱ्या मेट्रो लाइन 8च्या अगदी जवळ असणार आहे. या मेट्रोमुळे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि अनेक रेल्वे मार्गिकांशीही थेट जोडणी मिळणार आहे. यामुळे तिसऱ्या मुंबईत उद्योजक आणि व्यावसायिकांना सहजपणे पोहोचता येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा