Mumbai Drugs Seized: या नशेच्या गोळ्या टिटवाळा येथून मुंबईत आणि आजूबाजूच्या शहरांत पोहोचविल्या जात असल्याचे समजते.
नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज तस्करांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे अनिल ढोले यांच्या पथकाने बुधवारी साकीनाका परिसरातून इरफान अन्सारी या तरुणाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ड्रग्जच्या २०० गोळ्या जप्त केल्या होत्या. या गोळ्या त्याने कुठून आणल्या याची चौकशी केली असता गोळ्या पुरविणाऱ्या सुफियान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून टिटवाळा येथील लिंक समोर आली.
Nishikant Dube यांचं आदित्य ठाकरेंविरोधात वक्तव्य, ठाकरे गटाचं आंदोलन आणि घोषणाबाजी
तपासातून मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिस तीन ते चार दिवसांपासून एका महिलेच्या मागावर होते. अखेर शनिवारी ए. पॉल नावाची ही महिला टिटवाळा येथे सापडली. तिच्या घरामध्ये पाच हजार एक्स्स्टसी ड्रग्ज गोळ्या सापडल्या. पॉल ही पार्टी ड्रग्ज म्हणून वापरल्या जाणाऱ्या या गोळ्यांची साठवणूक करून घाऊक विक्रेत्यांना त्यांचा पुरवठा करते, अशी माहीत तपासातून पुढे आली आहे. तिच्या घरातून चार मोबाइल आणि सात सिमकार्डही जप्त करण्यात आले आहेत. यावरून ती किती जणांच्या संपर्कात होती याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Raj Thackeray: भाजप आतापर्यंत आमदार-खासदार फोडत होता, पण आता त्यांची मजल…; राज ठाकरे संतापले, महिला आरक्षणावर भूमिका जाहीर
ओळख लपवून वास्तव्य
पॉल ही महिला वारंवार घरे बदलते. प्रत्येक ठिकाणी ती भाड्याने वास्तव्य करते. प्रत्येक वेळी ती ओळख लपवून राहत असून शेजाऱ्यांनाही तिच्या हालचालींबाबत समजत नसल्याचे दिसून आले आहे.
नशेबाजांना प्रवेश देणाऱ्यास अटक
मुंबई : नेस्को सेंटर संगीत कार्यक्रमातील दोन ड्रग्ज मृत्यूप्रकरणी आरोपींची धरपकड सुरूच आहे. तिकिटांविना पैसे घेऊन नशेबाजांना आत प्रवेश देणाऱ्या एका सुरक्षारक्षकाला वनराई पोलिसांनी रविवारी अटक केली. प्रदीप गुप्ता असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून तो शीव कोळीवाडा येथे राहणारा आहे.
